Life Imprisonment
sakal
मराठवाडा
Life Imprisonment: वसतिगृह अधिक्षकाच्या खून प्रकरणातील दोघांना सक्तमजुरीसह जन्मठेप; हातउसने पैसे मागितल्याने झाला होता खून
Udgir News: उदगीर येथील वसतिगृह अधिक्षकाचा २५ हजार रुपये परत मागण्याच्या वादातून खून झाला. दोन आरोपींना सक्तमजुरीसह जन्मठेप आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
उदगीर, (जि.लातुर) : येथील वसतिगृह अधीक्षकाकडुन हात उसने घेतलेले २५ हजार रुपये परत मागत असल्याच्या वादातून झालेल्या खून प्रकरणी दोन जणांना जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. बी. गमे यांनी सक्तमजुरीसह जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

