esakal | महाराष्‍ट्रातील तीस नागरिकांचा दुबईत कसा झाला सन्मान...
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

दुबईला जाण्याचे अनेकांचे दिव्यस्वप्न असते. अनेकांचे उभे आयुष्य खस्ता खाल्यातरी त्यांचे स्वप्न पूर्णत्वास येत नाही. तर दुसरीकडे ध्यानी मनी नसताना अचानक दुबईच्या वारीसाठी फोन येतो आणि आनंद गगनात मावेनासा होते. अगदी असेच काहीसे महाराष्ट्रातील ३० नागरिकांच्या बाबतीत घडले आहे.

महाराष्‍ट्रातील तीस नागरिकांचा दुबईत कसा झाला सन्मान...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. बबन जोगदंड हे मागील पंधरा वर्षापासून पुणे येथील ‘यशदा’ मध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दोन वर्षापासून राज्यातील सामाजिक, आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा शोध घेत त्यांचे कार्य दुबईपर्यंत नेऊन पोहचवले. त्यांच्या पुढाकाराने लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आणि द प्रिअंबल आॅन द इंडियन कॉन्स्टिट्युशन यांच्या पुढाकारातुन हा सोहळा फेब्रुवारी महिण्याच्या पहिल्या आठवड्यात दुबईत पार पडला. यातील डॉ. विजयकुमार माहुरे, अनिल लोणे, आनंद इंगोले व अशोक शिरसे हे चार सदस्य नांदेड जिल्ह्यातील आहेत.

यांची होती उपस्थिती
दुबईतील रुलिंग फॅमिली सदस्य सालेम हमीद, आंतरराष्ट्रीय बिजनेसमन अली अल खान, अब्दुल अजीज, महाराष्ट्रातील रहिवासी असलेले व सध्या दुबई येथे स्थाईक असलेले उद्योजक सुनिल मांजरेकर व डॉ.भगवाई गवई, माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे, अशोक शिरसे व डॉ. बबन जोगदंड यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - Video :  पाहा शेतकऱ्याची हौस, जावयाची काढली हेलिकॉप्टरमधून वरात

यांना मिळाला दुबईत लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड-
रेखा खोब्रागडे, अलका गायकवाड, महावीर माने, डॉ. अशोक चव्हाण, अशोक शिरसे, रामचंद्र जाधव, उमाकांत कांबळे, डॉ. राजेश मोरे, डॉ. दत्तात्रय गायकवाड, पाडुरंग शेलार, डॉ. विजयकुमार माहुरे, आनंद इंगोले, एस. के. जोगदंड, अनिल लोणे, सुदेश गायकवाड, रवींद्र कुंजीर, डॉ. अदिती पाचरणे, डॉ. संतोष तावरे, डॉ. राहुलकुमार हिंगोले, विश्वास रायबोले, दिलीप बारणे, अरुण पवार, सुदर्शना त्रिगुणाईत, ज्योती पाचरणे, प्रितीश चौधरी, अंबादास अरोले, सुभाष चांदेरे, रमेश चव्हाण, दयाळ राठोड, डॉ. संतोष बोराडे, अनंत वेढे आणि अतुल गुगले या तीस महाराष्ट्रीयन नागरिकांचा समावेश आहे.

हेही वाचलेच पाहिजे -  गोदावरी नदीचे पावित्र्य जपण्याचे युवा पिढीला आवाहन


लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डचा आनंद द्विगुणीत
ध्यानी मनी नसताना दुबईला जाण्याची संधी मिळालेल्या अनेक नागरिकांनी सहकुटुंब दुबईची वारी केली. त्यांना दुबईतील प्रेक्षणीय स्थळे, दुबईचे टॉवर, दुबईचा ऐतिहासिक वारसा, वास्तुसंग्रहालय अशा विविध प्रेक्षणिक स्थळांचा आनंद घेत दुबईतील लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डचा आनंद द्विगुणीत केला.विविध क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल
मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील आरोग्य, शिक्षण, सामाजिक, उद्योग अशा विविध क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आणि द प्रिअंबल आॅन द इंडियन कॉन्स्टिट्युशन यांच्या पुढाकारातून हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातील तीस व्यक्तीस दुबईत हा अवॉर्ड देण्यात आला.
- डॉ. बबन जोंगदंड, अधिकारी यशदा, पुणे.
 

loading image