गोदावरी नदीचे पावित्र्य जपण्याचे युवा पिढीला आवाहन

Nanded Photo
Nanded Photo

नांदेड : देशातील इतर नद्यांप्रमाणे नांदेडची गोदावरी नदी प्रदूषित होत आहे. गोदावरीला प्रदूषणाच्या विळख्यातुन मुक्त करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, संघटना, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कार्य करत आहेत. तरीही हवे तेवढे यश अजून आले नाही. गोदावरी नदीचे पावित्र्य राखण्यासाठी व गोदावरीला प्रदूषणाच्या विळख्यातुन मुक्त करण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घेवून सर्वांनी एकजुटीने लोकसहभागातून काम करावे, असे राजेश पंडित यांनी तरुण पिढीला आवाहन केले. 

शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदीचे प्रदूषण होण्यामागे जबाबदार असलेल्या शहरातील सांडपाण्याचे योग्य नियोजन अजून देखील झाले नाही. त्यामुळे गोदावरीचे प्रदूषण थांबत नाही. नांदेड महापालिकेत सांडपाणी शुद्धीकरण सुरू आहे. परंतु, तांत्रिक त्रुटीमुळे ते पूर्णपणे होत नाही. शहरातील सांडपाण्याचे सर्व पाईप शुद्धीकरण प्रकल्पाशी जोडले नाहीत. वैयक्तिक पातळीवर प्रत्येक घरांना रेन वॉटर हार्वेस्टिंग व सांडपाण्यासाठी शोषखडा असलाच पाहिजे. नागरिकांनी साबण, शाम्पू, निरम्या ऐवजी पारंपरिक पद्धतीचे स्वच्छतेचे साधने वापरावीत. महाराष्ट्रासह इतर राज्यात ही गोदावरी नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक शाश्वत विकास आराखडा तयार करणे सुरु आहे असे मत राजेश पंडित यांनी केले.

गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी उगमापासून जनजाती यात्रा सुरु-
गोदावरी प्रकट दिनी (ता.चार) फेब्रुवारीपासून नाशिकच्या गोदावरी नदीपासून जलदूत राजेंद्र राणा यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी जलसाक्षरता मोहिम हाती घेण्यात आली आहे. शनिवारी ही यात्रा नांदेड शहरात दाखल झाली होती. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी या यात्रेचे स्वागत केले. या प्रसंगी रवी जन्नावार, आनंद कवळे, अदिनाथ ढाकणे, मधुकर आण्णा वैद्य, परमविश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ.परमेश्वर पौळ यांची उपस्थिती होती. यात्रेद्वारे नदीकाठच्या गावांना व शहरांना भेटी देऊन नदी प्रदूषणमुक्त, स्वच्छ व सुंदर राहावी याबाबत जनजागृती करत आहेत. जिल्ह्यात दाखल झाली होती. 

पीपल्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद-
सकाळी नऊ वाजता गोदावरी नदी घाटावर असलेल्या शनि मंदिराजवळ महापालिकेचे उपमहापौर सतीश देशमुख, गुरुद्वारा बोर्डाचे सर्व पदाधिकारी, जलदूत, जलप्रेमी, जलनायक, पर्यावरणप्रेमी, नदीप्रेमी, वृक्ष संवर्धन व संगोपन परिवाराचे वृक्षमित्र, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्यार्थी व महिलानी नांदेडकरांच्या वतीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले. दुपारी पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव, डॉ. अशोक सिद्धेवर यांच्यासह विद्यार्थी व नांदेडकरांसोबत या यात्रेतील नदी प्रेमींनी संवाद साधला. 

गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यातुन कायमची मुक्त झाल्याचे दिसेल

गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र निधी येतो. परंतु, या निधीतुन नेमकी कुठली स्वच्छता होते कळत नव्हते. निधी खर्च झाला तरी, स्वच्छता काही दिसत नव्हती. परंतु या पुढील काळात नाशिक ते नांदेड दरम्यान गोदावरी नदीवरील प्रदूषण मुक्तीसाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यातुन कायमची मुक्त झाल्याचे दिसेल. 
-प्रा.डॉ. परमेश्वर पौळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com