खाकीतील माणुसकी, झाले मयताचे नातेवाईक

file photo
file photo

नांदेड : धक्काधक्कीच्या जगात ज्याला कोणी नाही त्यांच्यासाठी संकट काळात खरे देवदूत म्हणून पोलिसांकडे पाहिल्या जाते. एवढेच नाही तर रस्त्यावर पडलेल्या, सडलेल्या व कुजलेल्या अनोळखी मृतदेहाचेसुद्धा पोलिसच नातेवाईक बनतात. त्यांच्यावर अंत्यसंस्कार तेच करतात.

या नेहमीच्या घटना आपण एकतो. परंतु नांदेडच्या रेल्वेस्थानकावर आजाराने त्रस्त झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह त्याच्या गावी पाठविण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी पुढाकार घेत स्वत:  ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी निधी जमा करून रवाना केला. त्यांच्या या खाकीतील माणूसकीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. हा प्रकार बुधवारी (ता. चार) घडला. 

काविळाने घेतला बळी

पुसद (जिल्हा यवतमाळ) येथील किशन प्रल्हाद राठोड (वय ४५) हे पोटाची खळगी भरण्यासाठी परिवारासह मुंबईला गेले होते. काम करत असतांना त्यांना काविळ या आजाराने गाठले. मुंबईमध्ये त्यांनी उपचार केला परंतु त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नव्हती. अखेर त्यांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. एका रेल्वेने ते आपली पत्नी माया व दोन लहान मुलांना घेऊन परतले. नांदेडच्या रेल्वेस्थानकावर ते बुधवारी (ता. चार) सकाळी उतरले. रेल्वेतून उतरताच त्यांनी चक्कर आली आणि त्यांचा मृत्यू झाला. 

पोलिसच झाले नातेवाईक

आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ रडत बसलेली माया राठोड हिला अनेकजण येऊन विचारत होते व पुढे जात होते. ती अनेकांना म्हणत होती की मला गावी जाण्यासाठी पैसे नाहीत मदत करा, परंतु माणूसकी विसरलेल्यांनी तिला मदत केली नाही. ही माहिती लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांना समजली. त्यांनी लगेच आपल्या कर्मचाऱ्यांना तिथे पाठविले. 

पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांचा पुढाकार

सहाय्यक पोलिस निरिक्षक स्वप्नाली धुतराज, प्रल्हाद राठोड, जीवराज लव्हारे, राजू राठोड, सुरेश महाजन, फरीद अहमद, मुंकुंद पराळे आणि श्री. शिंदे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. पंचनामा करून शासकिय रुग्णालयात मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून किशन राठोड याचा मृतदेह त्याच्या पत्नीच्या स्वाधीन केला. 

सर्वत्र पोलिसांचे कौतुक 

एवढेच नाही तर रुग्णवाहिका व अंत्यविधीसाठी सहा हजार रुपये जमा करून माया राठोड यांच्याकडे दिले. माया राठोड यांनी जड अंतकरणाने आपल्या पतीचा मृतदेह घेवून पुसदकडे रवाना झाल्या. शेवटी जातेवेळेस तीन पोलिसांचे आभार मानले. या घटनेची दखल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेवून मदत करणाऱ्या पोलिसांचे कौतुक केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com