विद्युततारेच्या धक्क्याने शंभरपेक्षा अधिक मेंढ्यांचा मृत्यू

sheep
sheep
Updated on

हतनूर : जैतापूर (ता.कन्नड, जि.औरंगाबाद ) परिसरातील शेतवस्तीवर रोहित्रावरून विजेची तार तुटल्याने विजेचा धक्का लागून सुमारे शंभरहून अधिक मेंढ्यांसह काही शेळा ठार झाल्याची घटना शनिवारी (ता.15) पहाटे घडली.

जैतापूर परिसरात ज्ञानेश्वर पंडितराव झाल्टे यांची गट क्रमांक 296 मध्ये जमीन आहे. येथे महावितरणचे एक रोहित्र आहे. रोहित्रापासून काही अंतरावर मेंढपाळांसह मेंढ्यांचा कळप बसलेला होता. शनिवारी पहाटे या रोहित्रावरील विजेची तार तुटली. यामुळे तुटलेल्या विजतारेचा धक्का लागल्याने मेंढपाळांच्या शंभरच्यावर मेंढ्यांसह 5 ते 7 शेळ्या मृत्युमुखी पडल्या. यामुळे मेंढपाळांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. 

वैजापूर तालुक्यातील वाकला येथील मेंढपाळ कडूबा आयनार, संजय शिंगाडे, सदा शिंदे, माधव शिंदे, अंबादास शिंगाडे हे आपल्या कुटुंबासह आणि शेकडो मेंढ्यांच्या कळपासह चारा- पाण्याच्या शोधात गेल्या दोन महिन्यांपासून  मेंढपाळ हतनूरसह जैतापूर परिसरात दाखल झाले होते. गेल्या महिनाभरापासून परिसरात मेंढपाळ भटकंती करत आपल्या मेंढ्यांच्या चारा पाण्याची तहान भागत असे. परंतु महावितरणच्या हलगर्जीपणामूळे सदर रोहित्रावरील कमकुवत तार तुटल्याने मेंढपाळांच्या शेकडो च्यावर मेंढ्या दगावल्याने, मेंढपाळ कुटुंबे हतबल झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com