बीड - लग्नानंतर वैवाहिक वादातून शहरात राहणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी अपहरण करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दगड व दांड्यांनी झालेल्या मारहाणीत तरुणाच्या हाता - पायांना फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.