नांदेडात पती- पत्नीचा एकमेकावर प्राणघातक हल्ला

file photo
file photo

नांदेड : घोरपडीच्या मटणाची भाजी करून देण्यास नकार देणाऱ्या पत्नीचा गळा आवळून व खंजरने मारून तिला ठार मारण्याचा पतीने प्रयत्न केला. ही घटना गोविंदनगर परिसरात शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. हल्लेखोर पतीविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलझाला. 

गोविंदनगर परिसरात राहणारा आरबाज उर्फ अब्बु पठाण (वय ३०) याने बाजारातून घरपड खरदी करुन आणली. त्या घोरपडीच्या मटणाची भाजी करण्यास त्याने आपल्या पत्नीला सांगितले. परंतु पत्नीने भाजी करण्यास नकार देताच या दोघांची अगोदर शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर हा वाद चव्हाट्यावर येऊन अरबाज उर्फ अब्बुने पत्नी सिमा (वय २५) हिचा गळा आवळून तसेच गळ्यावर खंजर मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात सिमा ही बालंबाल बचावली. तर रागाच्या भरात तीनेही पतीच्या गळ्यावर खंजर मारून त्यालाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. 

विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दोघे पती- पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने नातेवाईकांनी लगेच दोघांना शासकिय रुग्णालयात दाखल केले. पती अरबाज हा यात गंभीर जखमी झाला आहे. दोघांच्या एकमेकाविरुध्द आलेल्या तक्रारीवरुन विमानतळ पोलिस ठाण्यात ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. जाधव आणि श्री. शिनगारे करत आहेत. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के, पोलिस निरीक्षक संजय ननवरे यांनी भेट दिली. 

स्वच्छता कर्मचाऱ्यांना सॅनीटायझरचे वाटप

नांदेड : शहरामध्ये महानगर पालिकेचे साफसफाई कर्मचारी हे स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवित आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय बंजारा परिषदेचे डॉ. मोहन चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांना सॅनीटायझर, जेवणाचा डब्बा व गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले. 

कोरोना व्हायरसमुळे मानवी जीवनावर परिणाम झालेला आहे. स्वच्छतेचाला अधिक महत्त्व आलेले आहे. कोरोना व्हायरसची भीती न बाळगता मनपाचे स्वच्छता कर्मचारी शहर स्वच्छतेचे काम करीत आहेत. या कामगारांकडे सर्वांचे दुर्लक्ष असते. परंतु राष्‍ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. मोहन चव्हाण यांनी शहरातील विविध भागात जाऊन ज्या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेचे काम करीत आहेत तेथे भेट देऊन त्यांना सॅनिटायझर व जेवणाची व्यवस्था करून दिली. विशेष म्हणजे त्यांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com