
Latur Crime
sakal
उदगीर : वाढवणा पोलिस ठाणे हद्दीतील चाकूर तालुक्यातील शेळगाव फाटा मार्गावरील तिरू नदीवरील पुलाखाली अज्ञात आरोपींने महिलेचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये टाकला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नदीत फेकून दिला होता. या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून पतीनेच महिलेचा आपल्या साथीदारासह खून केला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील मयत महिलेच्या पतीसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली.