
हिंगोली : नवविवाहित पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून खून
वसमत (जि. हिंगोली) : हळद काढण्यासाठी आलेल्या मजुर पत्नीचा चारित्र्यावर संशय घेऊन खंजीरने गळ्यावर वार करीत निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी ता. चार सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. तालुक्यातील सारोळा येथील शिवारात हाळद काढणीसाठी मजुर पती-पत्नी आले होते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील सारोळा येथील शिवारात यासीन बागवान यांच्या शेतात मयत पत्नी अलका विश्वनाथ पोटे वय २१ व पती विश्वनाथ मारोती पोटे वय २३ रा. सोनवाडी, ता. औंढा नागनाथ हे हाळद काढणीसाठी मजुरीवर आले होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पती विश्वनाथ पोटे याने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी अलका पोटे हिच्या मानेवर धारदार खंजीराने वार केला. यात अलका पोटे गंभीर जखमी होऊन जाग्यावर मयत झाली.
घटनेची माहिती ग्रामीण ठाण्यास मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, अजय पंडीत यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. मयताची आई अरुणा ढाकरे रा.कोठारवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे यांनी भेट दिली.
Web Title: Husband Brutally Murdered On Suspicion Of Wifes Character
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..