
Beed Love Drama From Assault Allegation to Public Brawl
Esakal
बीडमध्ये ज्याच्यावर अत्याचाराचे आरोप केले होते त्याच्यासोबतच विवाहिता फिरताना नवऱ्याला रंगेहाथ सापडली. तेव्हा पतीने विवाहितेच्या कथित प्रियकराला मारहाण केली. शुक्रवारी दुपारी बीडमध्ये बसस्थानकासमोर ही घटना घडली. विवाहितेनं ज्याच्यावर अत्याचाराचे आरोप केले होते तो एपीआय असल्याची माहिती समोर आलीय. बीडमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून असताना त्याची शेजारी राहणाऱ्या पीडितेशी ओळख झाली होती आणि त्यांच्यात संबंध निर्माण झाले होते.