Beed Crime: पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू; गुन्हा दाखल, कौटुंबिक वादातून अंबाजोगाई शहरातील घटना
Crime News: अंबाजोगाईत कौटुंबिक वादातून पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीत मारहाणीमुळे गंभीर दुखापती झाल्याचे स्पष्ट झाले असून, पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाईत : कौटुंबिक वादातून पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना येथील क्रांतीनगर भागात बुधवारी (ता. १०) घडली. पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कैलास सरवदे (वय २७) असे मृताचे नाव आहे.