पत्नीला चपलेने मारले, आता भोगा 50 दिवसांचा कारवास (वाचा नेमकं कुठे)

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

औरंगाबाद : जेवण देण्याच्या कारणावरून पत्नीला चपलेने मारहाण केल्याप्रकरणी आरोपी पतीला 50 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी दिले. नेल्सन विल्सन श्रीसुंदर (वय 51, रा. लक्ष्मीकॉलनी) असे त्या आरोपीचे नाव आहे. 

हेही वाचा- आजवर जे राहून गेले, त्या सर्वांचा हा पुरस्कार : अनुराधा पाटील : पहा Video

औरंगाबाद : जेवण देण्याच्या कारणावरून पत्नीला चपलेने मारहाण केल्याप्रकरणी आरोपी पतीला 50 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी दिले. नेल्सन विल्सन श्रीसुंदर (वय 51, रा. लक्ष्मीकॉलनी) असे त्या आरोपीचे नाव आहे. 

हेही वाचा- आजवर जे राहून गेले, त्या सर्वांचा हा पुरस्कार : अनुराधा पाटील : पहा Video

एक जून 2014 रोजी आरोपीने पत्नीला जेवण मागितले. या कारणावरून पती - पत्नीमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले. संतापलेल्या नेल्सनने पत्नीला चपलेने मारहाण केली. यात पत्नीच्या बांगड्या फुटल्या आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली. प्रकरणात पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पती नेल्सनविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी नेल्सनला ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी वकील योगेश सरवदे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायालयाने पती नेल्सनला दोषी ठरवून 50 दिवसांचा कारावास, 200 रुपये दंड, दंड न भरल्यास तीन दिवस साधा कारावासाची शिक्षा सुनावली. 

क्लिक करा- बेकायदा घरांवर चालवा जेसीबी

लाचखोर अभियंत्याला जामीन नाहीच 

औरंगाबादेतील दुसऱ्या एका प्रकरणात एक लाख रुपयांची लाच घेणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिन नाकारला. बांधकाम न पाडण्यासाठी फिर्यादी मनोज लोखंडे यांच्याकडून एक लाख रुपये लाच घेतल्याच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेले महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचा शाखा अभियंता वामन कांबळे आणि विजय निकाळजे या दोघांना विशेष सत्र न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाने सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला. 

हे वाचलंत का?- Video : दिव्यांगांचे संसार उभे करणारा दिलदार ग्रुप

वरील दोघांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांवर शनिवारी (ता.21) सुनावणी होणार आहे. वामन कांबळेतर्फे ऍड. नीलेश घाणेकर काम पाहत असून, त्यांना ऍड. मच्छिंद्र दळवी आणि ऍड. प्रवीण कांबळे सहकार्य करीत आहेत. तर विजय निकाळजेतर्फे ऍड. एस.एस. लड्डा काम पाहत असून त्यांना ऍड. गुलशन मुंदडा, ऍड. नितीन हंडे आणि ऍड. सनी खिंवसरा सहकार्य करीत आहेत. तर सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर काम पाहत आहेत. 

उघडून तर पाहा- नांदेडात डॉ. श्रीराम लागू यांच्या आठवणींना उजाळा 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband Slammed Wife By Sandal, Get 50 Days Jail