esakal | कोरोनामुळे मी बंदीस्त झाले आहे, तुम्ही स्वत: ला सांभाळा- खासदार फौजिया खान 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सर्वसामान्य लोकांनी स्वताची काळजी घेत सोशल डिस्टसिंगचे तंतोतंत पालन करावे, कुणीही घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन खासदार फौजिया यांनी यांनी शनिवारी (ता. २५) सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेला केले.

कोरोनामुळे मी बंदीस्त झाले आहे, तुम्ही स्वत: ला सांभाळा- खासदार फौजिया खान 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे मी गेल्या पाच दिवसापासून घरात बंदीस्त आहे. कुठेही जाता येत नाही. कोरोना महामारीचे संकटाने देशात बिकट परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी स्वताची काळजी घेत सोशल डिस्टसिंगचे तंतोतंत पालन करावे, कुणीही घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन खासदार फौजिया यांनी यांनी शनिवारी (ता. २५) सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेला केले.

परभणीच्या राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रा. फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. ता. २० जुलै रोजी त्यांना दिल्लीला जायचे होते. त्या ठिकाणी होणाऱ्या शपथविधीला त्या उपस्थित राहणार होत्या. परंतू त्यांनी स्वताहून केलेल्या कोरोना चाचणी त्या पॉझिटीव्ह आल्या. प्रशासनाने तातडीने त्यांच्या घराला सिल करत त्यांना घरीच कॉरन्टाईन करून उपचार सुरु केले. गेल्या पाच दिवसापासून खासदार फौजिया खान या कोणाच्याही संपर्कात नव्हत्या. पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी व सर्वसामान्य लोकांनी फौजिया खान यांची विचारपुस करण्यासाठी फोनवरून त्यांना संपर्क साधला. शेवटी शनिवारी (ता. २५) खासदार फौजिया खान यांनी सोशल मिडियाचा आधार घेत लोकांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी लोकांना स्वताची काळजी घ्या, सोशल डिस्टसिंगचे तंतोतंत पालन करा व घराच्या बाहेर न निघता कामे करा असे आवाहन केले. 

 हेही वाचा कंधार न्यायालय : देहविक्री करण्यासाठी मुलींना पळविणाऱ्या टोळीचा जामीन नाकारला

सातत्याने समोर जावून लोकांची प्रश्न सोडवावी लागतात

यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, मी ता. २० जूलै रोजी दिल्लीला शपथ विधीसाठी जाणार होते. त्या आधी मी स्वताची कोरोना चाचणी केली. या कोरोना चाचणीचा अहवाल ता. २० जूलै रोजीच माझ्या हातात पडला. मी पॉझिटीव्ह असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने मला उपचारासाठी आरोग्य पथक पाठविले. माझे संपूर्ण घर सिल केले आहे. मला कोणतीच लक्षणे नव्हती. तरी मी पॉझिटीव्ह आले आहे. लोकप्रतिनिधी असल्याने आम्हाला लोकांमध्ये जावेच लागते. सातत्याने समोर जावून लोकांची प्रश्न सोडवावी लागतात. त्यामुळे आम्ही कुणाच्या तरी संपर्कात येतोच. परंतू सर्वसामान्य लोकांनी स्वताची काळजी घ्यावी असे आवाहन मी करते. आगामी काळात ईद व गणेशोत्सव सण साजरे केले जातील. परंतू लोकांनी हे सण घरातच राहूण साध्या पध्दतीने साजरे करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोरोना विषाणुंच्या संसर्गाचा धोका लवकरच कमी होईल असा मला विश्वास आहे असे ही त्या म्हणाल्या. निश्चितच आपण या कोरोना महामारीवर विजय संपादन करू तो पर्यंत लोकांनी स्वताची काळजी घेतली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 

loading image