esakal | Video : भाजपच्या मेगा भरतीची सुरवात मीच केली : पंकजा मुंडे
sakal

बोलून बातमी शोधा

i have started bjp mega bharati says pankaja munde

भाजपमध्ये मेगा भरतीची सुरवात सुरेश धस यांच्या प्रवेशाने आम्हीच बीडमधूनच केली असे ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. राज्याच राजकारणही जिल्ह्यातूनच जन्म घेतं असेही ते म्हणाले. 

Video : भाजपच्या मेगा भरतीची सुरवात मीच केली : पंकजा मुंडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : नमिता मुंदडा यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय सर्वांच्या चर्चेनंतर आणि विचारपूर्वकच घेतला आहे. मुळचे भाजपचे असलेले मुंदडा पुन्हा स्वगृही परतले याचा आनंद आहे. खरे तर भाजपमध्ये मेगा भरतीची सुरवात सुरेश धस यांच्या प्रवेशाने आम्हीच बीडमधूनच केली असे ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. राज्याच राजकारणही जिल्ह्यातूनच जन्म घेतं असेही ते म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांनी सोमवारी (ता. ३०) भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली. समर्पण, संघटन आणि सर्व्हे या तीन गोष्टींचा विचार करुन उमेदवारी ठरवावी या राष्ट्रीय अध्यक्षांनी ठरवून दिलेल्या निकषानुसार हा प्रवेश दिल्याचेही त्या म्हणाल्या. राज्याच्या राजकारणाच जिल्हा मुख्य केंद्र असून राज्याच राजकारणही जिल्ह्यातूनच जन्म घेतं असे सांगत याच कारणाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वांनी जिल्ह्यात येऊन उमेदवारी जाहीर केली असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

धनंजय मुंडे राज्यात नेतृत्व करतात असे वाटत नाही
दरम्यान, राज्याच नेतृत्व करणारे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे जिल्ह्याचे नेतृत्व करताना कमी पडत आहे असे वाटते का, या प्रश्नावर ते राज्याच नेतृत्व करतात असे मला वाटत नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.