
ओबीसी समाजाचे न्याय्यहक्क कुठल्याही परिस्थितीत अबाधित ठेवले जातील. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला तर वेळप्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे ओबीसी, मदत, पुनर्वसन आणि विमुक्त जाती भटक्या जमातीचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी (ता.पाच) येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
जालना : ओबीसी समाजाचे न्याय्यहक्क कुठल्याही परिस्थितीत अबाधित ठेवले जातील. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला तर वेळप्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे ओबीसी, मदत, पुनर्वसन आणि विमुक्त जाती भटक्या जमातीचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी (ता.पाच) येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. जालना जिल्हा काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांच्या निवासस्थानी मंत्री वडेट्टीवार यांनी शनिवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. श्री.वडेट्टीवार म्हणाले, मराठा आरक्षण हा विषय न्यायालयीन प्रक्रियेत आहे.
मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये. ही आमची भूमिका आहे. ओबीसी समाजाला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून न्याय्यहक्क मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहे. नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघात भाजपची विजयाची परंपरा ओबीसी समाज एकजूट झाल्याने आणि तसेच महाविकास आघाडी सरकारच्या कामामुळे मोडीत निघाली आहे. या मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विजयामुळे भाजपच्या विचारांविरुद्ध देशामध्ये मोठा संदेश गेला आहे. यावेळी आमदार राजेश राठोड, बबनराव तायवडे, बाळासाहेब सानप, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख मेहमूद, प्रदेश सचिव प्रा.सत्संग मुंढे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राम सावंत आदींची उपस्थित होती.
संपादन - गणेश पिटेकर