सैन्यदलामध्ये अधिकारी व्हायचे, तर ‘हे’ घ्या...

file photo
file photo

नांदेड : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी बुधवार (ता. १२) ते शुक्रवार (ता. २१) फेब्रुवारी या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ५२ आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची पूर्व प्रशिक्षणासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे गुरुवार (ता. सहा) फेब्रुवारी रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येतांना फेसबुक पेज वर Department of Sainik Welfare, Pune (DSW) वर सर्च करून त्यामधील एसएसबी- ५२ कोर्ससाठी किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या  प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ती पुर्ण भरुन सोबत घेऊन यावी.

एसएसबीसाठी ‍शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेवून यावेत. कंम्बाईंड डिफेन्स सव्हींसेस एक्झामिनेशन ( CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) उत्तीर्ण झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी 'C' सर्टिफिकेट 'A' ‍ किंवा  'B'   ग्रेडमध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने  एसएसबीसाठी ‍ शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry‍ Scheme साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी ‍शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

या ठिकाणी संपर्क साधावा

अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व  प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्र. 0253-२४५१०३१ आणि ०२५३-२४५१०३२ असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

बारावीतील मुलीची आत्महत्या

नांदेड : घरातून बेपत्ता झालेल्या महाविद्यालयीन युवतीचे प्रेत घराजवळील विहिरीत दोन दिवसानंतर सोमवारी (ता. २०) रोजी दुपारी तरंगताना आढळले. या प्रकरणी मांडवी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

मांडवीच्या दत्तनगर भागात राहणारी रोशनी तुळशीराम राठोड (वय १७ वर्ष सात महिणे) ही सरस महाविद्यालयात बारावीत शिकत होती. शनिवारी (ता. १८) जानेवारी रोजी ती कॉलेजला नेहमीप्रमाणे गेली. कॉलेज करून ती दुपारी घरी परत आल्यानंतर ती घरून बाहेर गेली ती परत आलीच नाही. मुलगी परत न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिच् मैत्रीणीकडे, नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र ती कुठेच सापडली नाही. नंतर तिची आई दुर्गा तुळशीराम राठोड यांनी मांडवी पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिसांचा तपास सुरू असतांना तिच्या घराजवळ असलेल्या विहीरीत सोमवारी (ता. २०) दुपारी बेपत्ता रोशनीचा मृत्तदेह पाण्यावर तरंगताना दिसला. या घटनेची माहिती मांडवी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर रेशमाचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. तपास फौजदार शिवप्रसाद कराळे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com