पीडितेवरील आत्याचाराविरोधात पक्ष संघटना एकवटल्या

photo
photo

नांदेड : शंकरनगरच्या श्री साईबाबा विद्यालयातील इयत्ता साहावीतील विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकांनी आत्याचार केल्याप्रकरणी समाज माध्यमातून तीव्र पडसाद उमटत आहेत. मागील चार दिवसांपासून विविध पक्ष सामाजिक संस्था व संघटनांच्या तीव्र निषेध व्यक्त करून पीडितेवर अत्याचार करणाऱ्या नरामधास आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन निषेध व्यक्त केला जात आहे.

सध्यी पीडित मुलीवर विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात शर्थीचे उपचार सुरू आहेत. दरम्यान, पीडितेवर झालेल्या आत्याचारा विरोधात शाळेतील चारही शिक्षकांसह संस्थाचालकावरदेखील गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 
बुधवारी (ता. २२) युवा पॅँथरचे राहुल प्रधान यांनी आपल्या सहाकाऱ्यांसह पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या वेळी पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच रोखल्यानंतर पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी ॲड. अविनाश भोसीकर, दिनेश लोणे, श्याम कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते धडक मोर्चात सहभागी झाले होते. 

अण्णा भाऊ साहित्य परिषद शिष्टमंडळाने घेतली पालकमत्र्याची भेट  
पीडित मुलगी कुठल्याही समाजाची असो, अशा घटना होणे हे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे असून पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर कार्यवाही व्हावी या मागणीसाठी अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल भंडारे, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण डोके, संभीजी सोमवारे, सी. व्ही. कांबळे, प्रा. डॉ. सारिका भंडारे, छाया बेले, एन. जी. पोतरे, के. एम. ढगे यांच्यासह शिष्टमंडळाच्या सदस्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन शंकरनगर श्री साईबाबा माध्यमिक विद्यालयाचील चारही शिक्षकांवर कठोरातील कठोर कार्यवाही व्हावी, सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडितेचे तत्काळ पुनर्वसन करण्यात यावे, पीडितेच्या आईस शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, घडलेल्या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली.

लालसेनेच्या शिष्टमंडळाकडून पीडितेची आस्थेवाईक चौकशी-

लालसेनेचे डॉ. गणपत भिसे, अविनाश मोरे, अशोक उबाळे, डॉ. किशोर कांबळे यांच्या शिष्टमंडळाने पीडित मुलीची भेट घेतली. त्यांनी शंकरनगरच्या श्री साईबाबा माध्यमिक विद्यालयाची मान्यता रद्द करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. 
शंकरनगर येथील श्री साईबाबा माध्यमिक विद्यालयात घडलेल्या प्रकरणासंदर्भात सविस्तर माहिती व तथ्य संकलित करून वास्तविक आहवाल तयार करण्याच्या उद्देशाने नॅशनल एससी, एसटी, ओबीसी स्टुडंट - युथ फ्रंट व फुले - शाहू - आंबेडकर युवा मंच मार्फत सत्यपताळणी समिती फॅक्चुअल अगेन्स, सेक्शुअल हरासमेंट आॅफ चाईल्ड अशी नऊ सदस्यांची समिती गठित केली असून त्याद्वारे घटनेतील अनेक तथ्य पडताळून पाहिले जाणार असल्याचे प्रा. सतीश वागरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com