Ajanta Ellora Film Festival : विख्यात संगीतकार इलयाराजा यांना यंदाचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर!

Ilaiyaraaja Padmapani Award : भारतीय चित्रपट संगीतातील दिग्गज इलयाराजा यांना यंदाचा प्रतिष्ठेचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर झाला आहे. २८ जानेवारी रोजी अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
Ilaiyaraaja Honoured with Padmapani Award

Ilaiyaraaja Honoured with Padmapani Award

Sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त दिला जाणारा प्रतिष्ठेचा पद्मपाणि पुरस्कार यंदा चित्रपट संगीताला नवी दिशा देणारे ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना जाहीर झाला आहे. येत्या २८ जानेवारीला छत्रपती संभाजीनगरात होणाऱ्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com