Illegal Cattle Transport : गेवराईतील पाडळसिंगीच्या टोलनाक्यावरअवैध जनावरे घेऊन जाणारा आयशर टेम्पो पकडला, चौदा म्हशींची सुटका
Georai News : गोरक्षकांनी गेवराईतील पाडळसिंगी टोलनाक्यावर रविवारी एक आयशर टेम्पो अडवून त्यातील १४ म्हशींना मुक्त केलं, त्यात एक म्हैस मृत अवस्थेत होती. पोलिसांनी आयशर टेम्पो आणि म्हशीसह दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गेवराई : बीडमधील नेकनूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे अवैधरीत्या जनावरे घेऊन चाललेला आयशर टेम्पो गेवराईतील पाडळसिंगीच्या टोलनाक्यावर रविवारी पहाटे गोरक्षकांनी अडवत पोलिसांच्या ताब्यात दिला.