Illegal Money Lending Case: अवैध सावकारीचा फड फोड; दोन भावांवर महाराष्ट्र सावकारी कायद्याखाली गुन्हा
Beed Police: स्वामी विवेकानंदनगर, ग्रामसेवक कॉलनी येथील मारुती व अण्णासाहेब मतकर यांच्यावर महाराष्ट्र सावकारी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला. २७ लाख घेऊन ३१ लाख परत घेण्याचा व्यवहार अवैध सावकारी ठरल्याचे प्राधिकृत अहवालात नमूद आहे.
बीड : शहरातील स्वामी विवेकानंदनगर, ग्रामसेवक कॉलनी येथे राहणाऱ्या मारुती संपतराव मतकर आणि अण्णासाहेब संपतराव मतकर या दोघांविरोधात महाराष्ट्र सावकारी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला.