निलंगा - निलंगा तालुक्यातील मौजे औराद शहाजानी व वांजरखेडा या सिमावर्ती भागात अवैध वाळुउपसा करण्यासाठी दोन बोट फिरत असल्याची गुप्त माहिती मिळताच महसूल विभागाच्या पथकाने झाडाला बांधून ठेवलेली बोटीचे इंजिन नष्ट केले. तर एक बोट पथकाला चकमा देवून कर्नाटक सिमापार पसार झाली. एक बोटीचा जवळपास तीन लाखाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.