godavari river sand
sakal
पाचोड - अनधिकृत उत्पन्नापुढे सर्व काही अलबेल झाले असून शासनाकडून वाळु उपशाला परवानगी मिळण्यापूर्वीच पैठण तालुक्यातील पाचोड सह अन्य पोलिस ठाण्याच्या हद्दीतून नव्या जोमाने गोदावरीपात्र वाळु तस्कराकडून पोखरण्यास सुरुवात झाली आहे.
गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांची मोठी रेलचेल वाढली असून पोलिसांसह अन्य प्रशासकीय यंत्रणेशी वाळूतस्करांनी 'जुळते' घेतल्याने वाळूतस्करांना मोकळे रान मिळाले असल्याचे पाहवयास मिळते. यामुळे शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडत आहे.