keshav gavande and satish sonawane
sakal
भोकरदन (जि. जालना) - शहरापासून जवळच असलेल्या गवळीवाडी शिवारात एका पत्र्याच्या गोठ्यात अनेक महिन्यांपासून अवैधपणे सुरू असलेल्या गर्भलिंगनिदान रॅकेटचा बुधवारी (ता. २६) सायंकाळी पर्दाफाश करण्यात आला. जालना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकून दोन संशयितांना अटक केली आहे. छाप्यावेळी तीन महिला गर्भलिंग निदानासाठी आल्याचे आढळले.