Beed News : बीडमध्ये नार्वेकरांच्या निकालाचा मुंडण करून निषेध ; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक काळा दिवस असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी केला.
Beed
Beed sakal

बीड : बंडखोरी करणाऱ्या आमदारांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक काळा दिवस असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी केला. याच्या निषेधार्थ पदाधिकाऱ्यांनी श्री. नार्वेकर यांच्या प्रतिमांना जोडे मारून मुंडण करत या निकालाचा निषेध केला.

राहुल नार्वेकर यांच्यावर दलबदलू नेता, अशी टीकाही यावेळी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे षड्‍यंत्र असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुंडण करून या निकालाचा निषेध केला.

Beed
Beed Crime : बालकाचा गळा दाबून खून; दाम्पत्याला जन्मठेप

तसेच श्री. नार्वेकर यांच्या प्रतिमांना जोड्याने मारण्यात आले. आंदोलनात जिल्हा समन्वयक संजय महाद्वार, जिल्हा संघटक नितीन धांडे, उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप, राजू महुवाले, सुशील पिंगळे, गोरख शिंगन, शेख निजाम, गजानन कदम, रवी वाघमारे, सय्यद नायुम, जगदीश वखरे, धनराज साळुंके सचिन उधाण, ओमकार राऊत, रमेश नवले, धममदीप वडमारे, अमित जोगदंड, नितीन मोरे, सचिन चंदनशिव, भूषण दहिवळे आदी सहभागी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com