Video: बीडमधील धक्कादायक प्रकार! ‘माझ्यावर भुकंतोय?’ कुत्र्याची गोळी घालून हत्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video: बीडमधील धक्कादायक प्रकार! ‘माझ्यावर भुकंतोय?’ कुत्र्याची गोळी घालून हत्या!

रस्त्यावर चालताना येता जाता कायमच कुत्रे भुंकतात. असंच कुत्रा अंगावर भुंकला म्हणून एकाने बंदुकीने गोळी घालत कुत्र्याला ठार केलं असल्याची घटना घडली. ही चीड आणणारी घटना बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात घडली आहे. परळीमधील धर्मापुरी फाट्याजवळ असणाऱ्या एका हॉटेलच्या आवारातील कुत्र्याने एका इसमावर भुंकला म्हणून त्याने गोळीबार केला आणि कुत्र्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. धर्मापुरी फाटा येथे विकास बनसोडे यांचे हॉटेल वीर बिअर बार हे हॉटेल आहे. हॉटेलच्या ठिकाणी त्यांनी काही कुत्रे देखरेख करण्यासाठी पाळले आहेत. या हॉटेलमधील एक कुत्रा या व्यक्तीवर भुंकला म्हणून गोळी झाडून कुत्र्याची हत्या करण्यात आली आहे.

हेही वाचा: Viral video: अचानक वीज चमकली अन् मुलीचं Reels करिअर संपलं

कुत्र्यावर अमानुषपणे गोळ्या झाडणारे रामराज घोळवे हे माजी कृषी अधिकारी असल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन कुत्रे एका व्यक्तीवर भुंकत जात असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर तो व्यक्ति हॉटेलच्या गेटवरून कुत्र्यांच्या मागे हॉटेलच्या मागेपर्यंत गेलेली ही व्यक्ती नंतर बाहेर हातात बंदुक घेऊन आल्याचंही कॅमेऱ्यात दिसून आलं आहे. यावेळी आणखी एक व्यक्ती तिथं उपस्थित असल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचा: Viral Video : विकतच्या कॅनचं पाणी तुम्हीही पिता का? आताच थांबवा नाहीतर...

विकास बनसोडे यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील कारवाई सुरु आहे. परळी ग्रामीण पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पुढील तपास करत आहेत. मात्र कुत्र्यांची गोळ्या घालून हत्या केल्यामुळे प्राणीप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Dogviral video