हिंगोलीत तीन सेंटरवर 450 जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधित लस

हिंगोलीत तीन सेंटरवर 450 जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधित लस
File photo
Summary

लस घेण्यासाठी ग्रामस्तरावर नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आता शहरी भागात नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत.

हिंगोली : आरोग्य विभागाच्या वतीने ४५ व ३० वर्षावरील नागरिकांसाठी पुन्हा लसीकरण मोहीम (Vaccination campaign) सुरू केली आहे. शहरात शनिवारी (ता. १८) तीन सेंटरवर झालेल्या लसीकरण मोहिमेत ३०० जणांनी कोव्हीशिल्ड (Coveshield) तर १५० जणांना कोव्हॅक्सीन (Covaccin) लस दिल्याची माहिती डॉ. नावेद अथहर यांनी दिली. (in hingoli, 450 people have been vaccinated on saturday)

हिंगोलीत तीन सेंटरवर 450 जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधित लस
हिंगोली जिल्ह्यात दुकानांसाठी सुधारित आदेश; खानावळ, रेस्टॉरंटमध्ये पन्नास टक्के ग्राहक

शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबीनोद शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न चालविले आहेत. आजघडीला जिल्ह्यात एक लाखापेक्षा अधिक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधित लस घेतली आहे. लस घेण्यासाठी ग्रामस्तरावर नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आता शहरी भागात नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत.

हिंगोलीत तीन सेंटरवर 450 जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधित लस
हिंगोली जिल्ह्यात यंदा सुवर्ण महोत्सवी भूजल अभियान राबविणार

लसीकरण बाबत नागरिकांमध्ये येणाऱ्या शंका कुशंकाचे निरसन करण्यात आले असून लस ही तेवढेच महत्त्वाचे असल्याचा एकमेव उपाय आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने कोव्हीशिल्ड लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली आहे. जवसळपास ३५ हजार डोस उपलब्ध असल्याचे डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.

हिंगोलीत तीन सेंटरवर 450 जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधित लस
हिंगोली नगरपरिषदेच्या नवीन तीन प्रकल्पास शासनाची मंजूरी

शनिवारी शहरात तीन सेंटरवर ३० व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये माणिक स्मारक विद्यालयात १५०, कल्याण मंडपम येथे १५०, सरजू देवी भिकुलाल भारुका विद्यालयात १५० असे एकूण मिळून तीन केंद्रावर ४५० जणांनी कोरोना प्रतिबंधित लस घेतली आहे. यासाठी लसीकरण प्रमुख डॉ. नावेद अत्तर यांनी तीन ठिकाणी आरोग्य कर्मचारी नियुक्ती करून लसीकरणासाठी परिश्रम घेतले.

हिंगोली जिल्ह्यात हळद लागवडीला सुरुवात; क्षेत्र वाढले

आता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेतले जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. कोव्हॅक्सीन लसीचा मात्र जिल्ह्यात तुटवडा असल्याने केवळ चार ते पाच हजार डोस असल्याचे सांगितले जाते. त्या प्रमाणात कोव्हीशिल्ड जवळपास ३५ हजार डोस उपलब्ध साठा आहे. त्यामुळे पहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे. नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (in hingoli, 450 people have been vaccinated on saturday)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com