esakal | हिंगोली जिल्ह्यात हळद लागवडीला सुरुवात; क्षेत्र वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली जिल्ह्यात हळद लागवडीला सुरुवात; क्षेत्र वाढले

हिंगोली जिल्ह्यात हळद लागवडीला सुरुवात; क्षेत्र वाढले

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने जमिनीत ओलावा असल्याचे शेतकरी सांगत असून अनेक भागात पेरण्या व हळद लागवडीचे काम सुरु झाले आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत हळद लागवड केली जात आहे.

जिल्ह्यात पन्नास ते साठ हेक्टरवर हळद लागवड केली जाते. पाण्याची व्यवस्था असलेले बहुतांश शेतकरी हळद लागवड करतात. नगदी पिक म्हणून हळदीला प्राधान्य दिले जाते. अनेक शेतकऱ्यांनी हळद लागलड सुरुवात केली आहे. त्यात काही शेतकऱ्यांनी मनुष्यबळ मिळत नसल्यामुळे आधुनिक पद्धतीचा वापर करून शेती काम लवकर व्हावे या उद्देशाने ट्रॅक्टरवर हळद टाकण्याचे नवीन यंत्र तयार करुन ट्रॅक्टरच्या सहाय्याने हळद लागवड सुरू केली आहे.

हेही वाचा - शरद पवार-प्रशांत किशोर भेटीवर आठवले यांचं विनोदी ढंगात कवितेतून भाष्य

जिल्ह्यात अनेक भागात मागच्या दोन तीन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने जमिनीत ओलावा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी बरोबर हळद लागवड सुरु केली आहे. शेतीच्या कामासाठी मनुष्यबळ कमी मिळत असल्याने शेतकरी आधुनिक पध्दतीने यंत्राचा वापर शेतीसाठी करीत आहेत. पेरणीपूर्वी मशागतीसह पेरणी, डवरणी, फवारणी आदी कामे यंत्राच्या साहाय्याने करीत आहेत. ट्रॅक्टरचा वापर अधिक होत आहे. यात नांगरटी, जमीन लेवल करणे, पेरणी करणे अशी कामे ट्रॅक्टरने केली जात आहे.

बैलजोडीचा वापर कमी झाला आहे. चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने बैलजोडी वापरने अवघड काम झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अनेक भागात हळद लागवड सुरु झाली आहे. हळद ट्रॅक्‍टरच्या साह्याने टाकल्या जात आहे. एका दिवसात म्हणजे बारा तासांमध्ये चार ते पाच एकर हळद ट्रॅक्‍टरच्या साह्याने टाकल्या जात असल्याचे चालक सांगत आहेत.

येथे क्लिक करा - लिसा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे.

पाच एकर हळद टाकण्यासाठी जवळपास चार बैल आणि २० ते २५ मनुष्यबळ लागतात तर हे काम ट्रॅक्टरने एका दिवसात होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. आधुनिक युगात शेतकरी यंत्राचा वापर करुन शेतीकाम सोयीस्कर होईल या दृष्टिकोनाने वाटचाल सुरु असल्याचे चित्र या यंत्रणेमार्फत दिसून येत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image