esakal | हिंगोली जिल्ह्यात शासकीय कोविड सेंटरमध्ये ४३ तर १२ खासगी रुग्णालयात २२ ऑक्सीजन बेड रिक्त

बोलून बातमी शोधा

हिंगोली रुग्णालय
हिंगोली जिल्ह्यात शासकीय कोविड सेंटरमध्ये ४३ तर १२ खासगी रुग्णालयात २२ ऑक्सीजन बेड रिक्त
sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्या रुग्णासाठी ऑक्सीजन बेड अपुरे पडत आहेत. आजघडीला शासकीय कोविड व खासगी कोविड सेंटर मिळून एकूण ८२२ ऑक्सिजन बेडपैकी ६५ ऑक्सीजन बेड तीन मे अखेरपर्यंत रिक्त असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात आजघडीला सहा शासकीय डेडीकेटेट कोविड हेल्थ सेंटरची संख्या असून या सहा सेंटरमध्ये एकूण ५४० बेड आहेत, यापैकी १५५ रुग्णांना ऑक्सीजनची गरज नाही. तर ३५४ रुग्ण हे ऑक्सीजनवर आहेत. त्यामुळे आजघडीला या सहा रुग्णालयात ५०९ रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर यातील अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने त्यांचे बेड शिल्लक आहेत. यामध्ये ४३ ऑक्सीजन बेड रिक्त आहेत. भरती असलेल्या २७ रुग्णांना रेमडेसीव्हीरचा पहिला डोस देण्यात आला असून १६० रुग्णांना दुसरा डोस दिला आहे. या सेंटरमध्ये केवळ अकरा रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा साठा असून २०३ इंजेक्शनची आवश्यकता असल्याचे डॉ. गोपाल कदम यांनी सांगितले. दरम्यान, या शासकीय संस्थेमध्ये सामान्य रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल बस स्टँड, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सेन्टर कळमनुरी, डीसीएचसी वसमत, डीसीएचसी सिद्धेश्वर, डीसीएचसी कौठा या सहा सरकारी संस्थांचा समावेश आहे.

हेही वाचा - महाराष्ट्राला कलंकीत करणारी घटना ! नांदेड जिल्ह्यातील 'या' गावाचा दलित समाजावर बहिष्कार; किराणा सामान, दूध आणि औषधंही बंद

तसेच खासगी बारा कोविड हॉस्पिटल सेंटरचा समावेश केला असून, या बारा सेंटरमध्ये एकूण बेड २८२ पैकी ११२ रुग्णावर ऑक्सीजन सुरु आहे. तर १२० रुग्ण हे ऑक्सीजनशिवाय आहेत. आजघडीला या बारा कोविड सेंटरमध्ये २३२ कोविड सदृश्य रुग्णावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे २२ ऑक्सीजन बेड शिल्लक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले. ऑक्सीजन लावण्यात आलेल्या २० रुग्णांना रेमडेसीव्हीरचा पहिला डोस देण्यात आला, तर ८८ रुग्णांना दुसरा डोस देण्यात आला. सहा रेमडेसीव्हीर इंजेक्शन शिल्लक असून १२२ इंजेक्शनची मागणी केली असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले. या खासगी कोविड सेंटरमध्ये महेश कोविड सेंटर, नाकाडे कोविड सेंटर, आयकॉन कोविड सेंटर माऊली कोविड हेल्थ सेंटर, तिरुमला, शिवम ,पतंगे, सातपुते, संजीवनी, विवेकानंद, द्वारका, जगदंबा या बारा कोविड हेल्थ सेंटरचा खासगी रुग्णालयात समावेश केला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे