esakal | जालना जिल्ह्यात ३७४ जणांची कोरोनावर मात, पाच रुग्णांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित चित्र.

सध्या जिल्ह्यात तीन हजार ४९७ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जालना जिल्ह्यात ३७४ जणांची कोरोनावर मात, पाच रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : जिल्ह्यात (Jalna) बुधवारी (ता.२६) उपचारानंतर ३७४ जणांनी कोरोनावर (Corona) मात केली आहे. तर ठिकठिकाणी नव्याने २१२ रुग्ण आढळून आले आहेत. पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाची लाट हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे सुखद चित्र पाहण्यास मिळत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे. बुधवारी ३७४ कोरोना रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ५५ हजार २४० रुग्णांनी उपचारानंतर कोरोना मात केली आहे. दरम्यान, नव्याने २१२ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जालना शहरात ४० तर जालना तालुक्यात दहा रुग्ण आढळून आले आहेत. मंठा शहरात सहा व तालुक्यात १४, परतूर शहरात चार व तालुक्यात १५, घनसावंगी शहरात सहा व तालुक्यात ४५, अंबड शहरात चार व तालुक्यात १५, बदनापूर शहरात एक व तालुक्यात सात, जाफराबाद शहरात दोन व तालुक्यात १२, भोकरदन शहरात एक व तालुक्यात १३ तसेच इतर जिल्ह्यातील १७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ५९ हजार ७३४ कोरोना रुग्ण निष्पन्न झाले आहेत. दरम्यान, बुधवारी पाच कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ९९७ जणांचा जीव गेला आहे. सध्या जिल्ह्यात तीन हजार ४९७ सक्रिय कोरोना (Corona Active Patients In Jalna) रुग्णांवर उपचार सुरू आहेत. (In Jalna District Above Three Hundred People Cured From Corona)

हेही वाचा: तरुण डाॅक्टरची झुंज अयशस्वी, आर्थिक मदत लवकर मिळाली असती तर..

जिल्ह्यात ७८६ रुग्ण ऑक्सिजनवर

जिल्ह्यात सक्रिय असलेल्या कोरोना रुग्णांपैकी एक हजार १२३ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यापैकी ७८६ रुग्ण हे ऑक्सिजनवर असून ८५ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. तर २०८ रुग्ण हे आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. दोन हजार ३३४ होमक्वारंटाईन आहेत तर ३५१ रुग्ण हे संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आकडेवारी

एकूण कोरोनाबाधित : ५९ हजार ७३४

एकूण कोरोनामुक्त : ५५ हजार २४०

एकूण मृत्यू : ९९७

उपचार सुरू : ३ हजार ४९७