esakal | कुपटा गाव बनतयं कोरोनाचा हॉटस्पॉट

बोलून बातमी शोधा

कुपटा गाव बनतयं कोरोनाचा हॉटस्पॉट

कुपटा (ता.सेलू) येथे मागील सात ते आठ दिवसांपासून कोरोना बाधीत रुग्णाची झपाट्याने वाढ होत आहे.

कुपटा गाव बनतयं कोरोनाचा हॉटस्पॉट
sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू (परभणी) : कुपटा (ता.सेलू) (Kupta village) येथे मागील सात ते आठ दिवसांपासून कोरोना (Corona) बाधीत रुग्णाची झपाट्याने वाढ होत आहे. सद्य:स्थितीत गावात ५१ रुग्ण अॅक्टिव्ह (Active)तर आतापर्यंत चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी दिपक सावळे यांनी दिली. (In Kupta village the number of patients infected with corona is increasing rapidly)

उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आणि तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता कुपटा गावाला मंगळवारी (ता.०४) रोजी दुपारी भेट दिली. यावेळी त्यांनी कुपटा येथील आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी भेट दिली असता दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक सावळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास मोरे, मदतनीस शिला सोळंके येवढेच कर्मचारी उपस्थित होते. यावर बाकी कर्मचारी यांच्यावर विचारले असता सिष्टर, परिचारिका एस.एस.चौधरी रजेवर असल्याचे सांगितले.

त्यावर श्री. पारधी यांनी अशा अडचणीच्या काळात रजा कोन्ही मान्य केली व कोणत्या कारणासाठी रजा मान्य केली आणि त्याठिकाणी दुसरा कर्मचारी का देला नाही. अशा अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित अधिकारी यांना विचारले. त्यानंतर तहसीलदार बालाजी शेवाळे यांना त्यांच्या वरिष्ठांना ग्रामसेवक, परिचारिका, तलाठी यांना उपस्थित न राहिल्या बदल कारणे दाखवा नोटीसा काढा, अशा सूचना दिल्या.

पुढे बोलताना श्री. पारधी म्हणाले या महामारीच्या काळात जर कोणत्याही कर्मचार्‍यांनी दिरंगाई, कामात कसुर केला तर त्याच्यांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सांगितले.

हेही वाचा: सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचालींना वेग

उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार येऊन जाताच त्यांच्या पाठोपाठ गटविकास अधिकारी विष्णू मोरे आणि तालुका विस्तार अधिकारी सुधाकर धायडे यांनी गावकऱ्यांनी उभारलेल्या कुपटा येथील ज्ञानोपासक विद्यालयातील विलगीकरण कक्षाला भेट देऊन रुग्णांची ऑक्शिमीटरच्या साह्याने ऑक्सिजन आणि थरमामीटर गनच्या साह्याने तापमान चेक करुन आरोग्याविषयी विचारणा केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कुपटा गावात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा ही पुढील दहा दिवसासाठी बॅंक बंद ठेवण्याच्या सूचना बँक व्यवस्थापक सचिन ठोके यांना दिल्या आहेत.

त्याच प्रमाणे कुपटा गाव पुढील 14 दिवस केंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून गावातुन बाहेर व बाहेरुन आत येणार्‍या व्यक्तीस बंदी घालण्यात आली आहे. याचे उल्लंघन करणार्‍यावर फौजदारी कलमे दाखल लावली जातील, अशा सूचनाही त्यांनी गावकर्‍यांना दिल्या. बुधवारी ( ता.०५ ) रोजी गावातील आरोग्य उपकेंद्रात आरोग्य विभागाच्या वतीने आरटिपिसीआर चाचणी करण्यासाठी कॅम्प ठेवला आहे. त्यात जास्तीत जास्त नागरिकांनी तपासण्या करुन घेण्याचे आवाहन तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी केले आहे.

"कुपटा येथे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचे लक्षणे जाणवताच नागरिकांनी आपली स्वतःची कोरोना तपासणी करुन घ्यावी. तपासणी पॉझिटिव्ह आल्यावर घाबरुन न जाता वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्याने पुढील उपचार करुन घ्यावा. कोन्हीही अंगावर दुखणे काढु नये. प्रशासन जनतेसाठी मदत करण्यासाठी तयार आहे."

- उमाकांत पारधी, उपविभागीय अधिकारी, सेलू

(In Kupta village the number of patients infected with corona is increasing rapidly)