esakal | सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचालींना वेग
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अशासकिय संचालक मंडळ नियुक्त करण्यासाठी शिवसेनेनेही दावा केल्याने मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मंडळ स्थापन्यावरुन संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचालींना वेग

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : गैरव्यवहार प्रकरणी येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर राष्ट्रवादीने बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र अशासकिय संचालक मंडळ नियुक्त करण्यासाठी शिवसेनेनेही दावा केल्याने मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मंडळ स्थापन्यावरुन संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात गैरव्यवहार झाल्याची तक्रार राष्ट्रवादी काॅग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे आणि माऊली ताठे यांनी केली होती. त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी समिती नेमली. त्यात अनियमिता झाल्याचे आढळून आल्यानंतर ( ता. १९ ) जानेवारी रोजी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश काढले होते. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या ताब्यातील बाजार समिती बरखास्त करण्यात श्री. भांबळे यांनी यश मिळवले.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने जिंतूर, जि. परभणी प्रमाणेच येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करुन बाजार समीती ताब्यात घेण्यासाठी माजी आमदार विजय भांबळे यांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. प्राप्त माहितीनुसार पुन्हा एकदा अशासकीय प्रशासक मंडळावर शिवसेनेकडूनही दावा केला जात असल्याने अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आली आहे. हा पेच मुंबईत वरिष्ठ पातळीवर दोन्ही पक्षात काय तडजोड केली जाते की? हा विषय रखडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सध्या बाजार समितीचे मुख्य प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे तर प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक माधव यादव हे काम पाहत आहेत.

राष्ट्रवादीकडून अनेक इच्छुकांची फिल्डिंग.

येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळात स्थापन झाले तर मुख्य प्रशासक म्हणून तसेच मंडळात  आपलीच वर्णी लागावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. यामध्ये माजी आमदार विजय भांबळे हे कोणाच्या नावाला पसंती देतात यावर पदाधिकांची फिल्डिंग यशस्वी होणार असल्याची चर्चा रंगत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image