श्री गुरु गोबिंदसिंघजी हॉकी स्पर्धेचे उदघाटन

कृष्णा जोमेगावकर
शनिवार, 28 डिसेंबर 2019

४७ वी अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट स्पर्धेचे उदघाटन झाले.

नांदेड : येथील खालसा हायस्कुलच्या मिनी स्टेडियमवर शुक्रवारी (ता. २७) ४७ वी अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट स्पर्धेचे उदघाटन झाले. या सामन्यात नांदेड, पुणे, नागपूर, हैद्राबादच्या संघाने विजयी सलामी दिली.

या स्पर्धेचे उदघाटन गुरुद्वारा तख्त सचखंड हजुरसाहेबचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, पंजप्यारे भाई रामसिंघजी, संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवावाले, संत बाबा तेजासिंघजी जत्थेदार माता साहेबदेवाजी गुरुद्वारा यांच्या हस्ते झाले.

यावेळी कथाकार ज्ञानीबक्शिसिंघजी, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अमित तेहरा, नानकसिंघ घाडीसाज, वरियमसिंग नवाब, गुरुद्वारा सदस्य भागिन्दर सिंघ घाडीसाज, मोहनसिंग गाडीवाले, डॉ. हरदीपसिंग, स. चांदसिंघ मुख्याध्यापक, अजितसिंघ जालनेवाले, नरिंदर सिंघ लिखारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा--रेल्वे चोरट्यास पोलिस कोठडी

 सत्कार कार्यक्रम

सुरुवातीला श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आयोजन समितीचे प्रमुख नगरसेवक गुरमीत सिंघ नवाब यांनी सर्व अतिथींचे सत्कार केले.
 
संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर नांदेड जुनिअर संघ आणि हॉकी संघ औरंगाबाद या दोन संघाच्या खेळाडूनचि ओळख करून खेळाचे उदघाटन करण्यात आले.

संतांची उपस्थिती
यावेळी संतबाबा कुलवंतसिंघजी आणि संतबाबा नरिंदरसिंघजी यांनी हॉकी खेळून सुरुवात करून दिली. यावेळी आयोजनात मदत करणाऱ्या संस्था गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड, गुरुद्वारा लंगर साहिब, गुरुद्वारा नानकझीरासाहेब बिदर, गुरुद्वारा माता साहेब आणि दानशूर व्यक्तींचे आभार व्यक्त करण्यात आले.
हरविंदर सिंघ कपूर, महेंद्र सिंघ लांगरी, जितेंदर सिंघ खैरा, हरप्रीत सिंघ लांगरी, संदीप सींग अखबारवाले, जसपालसिंघ कालों, जसबीर सिंघ चिमा, महेंद्र सिंघ गाडीवाले, अमरदीप सिंघ महाजन, विजयकुमार नंदे, जोगिंदर सिंग सरदार, मनमीत सिंघ शिलेदार आदी पदाधिकाऱ्यांनी खेळाच्या नियोजांत मदत केली. क्रीडा संचालक डॉ. जुझारसिंग शिलेदार यांनी सूत्रसंचालन केले.

येथे क्लिक करा ---हिंगोली जिल्‍ह्यात ढगाळ वातावरणाने रब्बी पिके धोक्यात

नांदेड, पुणे, नागपूर, हैद्राबादची विजयी सलामी
उदघाटन साखळी सामना हॉकी संघ नांदेड (कनिष्ठ) विरुद्ध हॉकी संघ औरंगाबाद यांच्यात खेळविण्यात आला. यात नांदेड संघाने विजयी सलामी देत तीन विरुद्ध एक अशा फरकाने सामना जिंकला. दुसरा साखळी सामना बीईजी पुणे विरुद्ध अमरावती संघात झाला. या सामन्यात पुणे संघाने तीन गोल केले. तर अमरावती संघाला फक्त एकच गोल साधता आले. तिसरा सामना नागपूर विरुद्ध मुंबई रिपब्लिकन संघात खेळण्यात आला. यात नागपूर संघाने मुंबई संघाचा चार विरुद्ध एक अशा गोल फरकाने धुव्वा उडवला. चौथा सामना एसी गार्ड हैद्राबाद आणि जरकार्ह हॉकी संघ यांच्यात झाला. हैद्राबाद संघाने दोन - शुन्य गोलाने हा सामना जिंकला.

रविवारी होणारे सामने
# एसएजी गांधीनगर विरुद्ध हॉकी अमरावती
# एसईसी रेल्वे विरुद्ध हॉकी नांदेड (बी.)
# मुंबई कॅस्टम विरुद्ध हॉकी नागपूर
# कोल्हापूर पोलीस विरुद्ध एसी गार्ड हैदराबाद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of Sri Guru Gobind Singhji Hockey Tournament