जालना ‘एमआयडीसी’ त प्राप्तिकर विभागाचे छापे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Income Tax Department raid

जालना ‘एमआयडीसी’ त प्राप्तिकर विभागाचे छापे

जालना - येथील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) काही स्टील कंपन्यांसह शहरातील काही व्यापाऱ्यांच्या दुकानांवर प्राप्तिकर विभागाने बुधवारी (ता.तीन) छापे टाकून झाडाझडती घेतली. या कारवाईसाठी तब्बल शंभरपेक्षा अधिक वाहनांद्वारे अधिकारी-कर्मचारी दाखल झाले होते. हे मोठे पथक मुंबईहून आल्याची चर्चा होती.

येथील स्टील उद्योग प्रसिद्ध असून विविध कंपन्यांची सळई देशासह परदेशात जाते. प्राप्तिकर, जीएसटी विभागाकडून या उद्योगातील काही कंपन्यांची अधूनमधून तपासणी होते. त्यानुसार आज औद्योगिक वसाहतीत सुमारे शंभर वाहनांद्वारे प्राप्तिकर विभागाचे अधिकारी दाखल झाले. अनेक स्टील कंपन्यांवर छापे टाकून अधिकाऱ्यांनी कागपत्रांची तपासणी केल्याची चर्चा होती.

या पथकातील काही अधिकाऱ्यांनी शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानांवरही छापा टाकला. यात जिंदमाल मार्केटमधील दुकानाची झाडाझडती घेत ‘विमलराज संपातराज सिंगव्ही’नामक दुकान सील केले. शहरातील जुना मोंढा, बडीसडक येथील काही कापड व्यापाऱ्यांच्या दुकानांचीही तपासणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. दिवसभरातील या कारवाईसंदर्भात पथकातील अधिकाऱ्यांनी गोपनीयता बाळगली होती. त्यामुळे कारवाईमागील कारण, नेमके काय सापडले याबाबत माध्यमांना माहिती मिळू शकली नाही.

वाहनांवर लग्नाचे पोस्टर!

सुमारे शंभरपेक्षा जास्त वानांतून प्राप्तिकर विभागाचे अधिकारी-कर्मचारी येथे दाखल आले होते. प्रत्येक वाहनांवर लग्नाचे पोस्टर चिकटवलेले होते. वाहने मुंबई पासिंगची होती, मात्र, पथकातील बहुतांश अधिकारी नाशिक विभागातील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

Web Title: Income Tax Department Raid At Jalna Midc Including Steel Companies

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top