esakal | हिंगोलीत मोफत बियाणाचे अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांची गैरसोय
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी मोफत बियाणे

हिंगोलीत मोफत बियाणाचे अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांची गैरसोय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सेनगाव (जिल्हा हिंगोली) : कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना (Agri department) मोफत बियाणे वाटप करण्याची योजना सुरु आहे. मात्र सेनगाव शहरातील ऑनलाइन सेंटर अचानक बंद ( online center closed) केल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होताना पहायला मिळत आहे. (Inconvenience to farmers in submitting free seed application in Hingoli)

राज्य शासनाकडून कृषी विभागामार्फत मोफत बियाने वाटप करण्याची योजना राबवली जात आहे. मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर सोमवारी (ता. १७) पोलिस प्रशासन व नगरपंचायतकडून सेनगाव शहरातील मेडिकल, दवाखाने, कृषी केंद्र वगळता सर्व दुकाने अचानक बंद करण्यात आले आहेत. सध्या शेतकऱ्यांना मोफत बियानासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु ऑनलाइन सेंटर सुध्दा अचानक बंद करण्यात आल्यामुळे बियाणाचे अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांची गैरसोय होताना दिसून येत होती. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आता शेवटची तीनच दिवस शिल्लक राहिल्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज सादर करायचे कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आधीच बँकांकडून शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप होत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सध्या मे महिना संपत आला असून जून महिन्यामध्ये पेरणीचे दिवस सुरु होत असतात. अशातच बियाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे सुध्दा नाहीत.

हेही वाचा - वाका येथे अंगणात झोपलेल्या तरुणाचा गळा चिरुन खून; लोहा तालुक्यातील घटना

बियाणाचे भाव गगनाला भिडले आहेत. पेरणीसाठी शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाकडून मोफत बी- बियाणे वाटप करण्याची योजना राबवली जात आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केलेले नाहीत. आणि अशातच ऑनलाइन सेंटर बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होताना पहायला मिळत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना मोफत बियाणासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गातुन होऊ लागली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे