Imtiaz Jaleel : मटण- चिकन बंदीच्या निषेधार्थ इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; मुख्यमंत्र्याना निमंत्रण, म्हणाले- आज देशातील...

Imtiaz Jaleel : कल्याण-डोंबिवली, नागपूर, अमरावती, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये ही बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयाला विरोध केला जात आहे. इम्तियाज जलील यांनीही याला विरोध केला आहे.
Imtiaz Jaleel serves biryani at a public gathering in protest against the meat ban on Independence Day in Chhatrapati Sambhajinagar.
Imtiaz Jaleel serves biryani at a public gathering in protest against the meat ban on Independence Day in Chhatrapati Sambhajinagar.esakal
Updated on

Summary

  1. इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्यदिनी मटण-चिकन विक्री बंदीच्या निषेधार्थ बिर्याणी पार्टी आयोजित करून मुख्यमंत्री आणि आयुक्तांना निमंत्रण दिले.

  2. त्यांनी बंदीला "तुघलकी फर्मान" म्हणत लोकशाहीत असा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले व राज ठाकरे यांच्या मताचे समर्थन केले.

  3. ईदला दारू विक्री बंद ठेवावी, पण स्वातंत्र्यदिनी मांसविक्री बंदीचे आदेश मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

स्वातंत्र्यदिनी महानगरपालिकेच्या मांसविक्री बंदीच्या निर्णयाचा निषेध करत इम्तियाज जलील यांनी बिर्याणी पार्टीचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती संभाजीनगरच्या पालिका आयुक्तांना त्यांनी पार्टीचं निमंत्रण दिले आहे. आज देशातल्या सर्वात मोठा सण आज आहे त्यामुळे आजच मला बिर्याणी खायची आहे, असं जलील म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com