esakal | भारतीय संशोधनातून चिनी उत्पादनांचे वर्चस्व मोडीत निघेल - बी. थियागराजन
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद - भानुदासराव चव्हाण सभागृहात शनिवारी ब्लू स्टार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी उपस्थित उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर.

काळानुरूप होतेय ‘सकाळ’ची वाटचाल 
काळानुरूप होणारे बदल ‘सकाळ’नेही स्वीकारले आहेत. वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून समाजात बदल घडविण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ करीत आहे. ‘सकाळ’ने प्रश्न फक्‍त मांडले नाहीत, तर त्यांच्यावर तोडगा काढण्यासाठीही ठाम भूमिका घेतली आहे. यापुढेही बदल घडविण्यासाठी हा माध्यम समूह कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी सांगितले. औरंगाबादेतील उद्योगांनी ‘सकाळ’ला साथ दिली आहेच. हा ऋणानुबंध यापुढेही कायम राहण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भारतीय संशोधनातून चिनी उत्पादनांचे वर्चस्व मोडीत निघेल - बी. थियागराजन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - ‘उत्पादन अन्‌ कमी किमतीच्या शर्यतीत चीनचा पराभव करणे अशक्‍य आहे, ही बाब आता इतिहासजमा झाली आहे. भारतात संशोधनातून चिनी उत्पादनांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठीचा जबरदस्त ‘सिलसिला’ सुरू झाला आहे,’’ असे मत ब्लू स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन यांनी व्यक्त केले.

‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या विसाव्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (ता. एक) ‘हाऊ टियर टू सिटीज लाईक औरंगाबाद शूड प्रमोट इटसेल्फ फॉर ग्रोथ’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. भानुदासराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी औद्योगिक जगतातील बदलांचा लेखाजोखा औरंगाबादेतील उद्योजकांसमोर मांडला. 

इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंमध्ये चिनी उत्पादनांना तोड नाही, असे बोलले जायचे. पण आज त्यांच्या उत्पादनांना स्वस्त, टिकाऊ आणि दर्जेदार पर्याय तयार केले जात आहेत. बाजारपेठांमध्ये होणारे बदल सांगताना त्यांनी बाजारपेठांवर होणारे ई-कॉमर्सचे डिस्काउंट आणि व्हरायटीचे संक्रमण, कस्टमरचे प्रोफाईल बदलत आहे, अपेक्षा बदलत आहेत. याचा अनुभव आपण दररोज घेत आहोत. तथापि, सध्या होत असलेला विकास हा रोजगारविरहित आहे, याची जाण ठेवून आपल्या कामात बदल करणे अपेक्षित असल्याचे बी. थियागराजन यांनी नमूद केले. मागणी कुठून येईल, हे सांगता येत नाही, याविषयीचे उदाहरण देताना बी. थियागराजन म्हणाले, की बंगळुरूमधील ४० टक्के लोक सकाळी नाश्‍त्याला पास्ता खातात, हे याचेच द्योतक आहे.

‘सकाळ माध्यम समूह’ कायम चांगल्यांच्या पाठीशी - कुलकर्णी
‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमात औरंगाबादच्या उद्योगांचे वर्तमान आणि भविष्य या विषयावर मुकुंद कुलकर्णी यांनी आपले मत मांडले. औरंगाबादेत चार हजारांपेक्षा अधिक उद्योग आहेत. त्यांच्या माध्यमातून १२ हजार कोटींचा महसूल येथील उद्योग देतात. सुमारे तीन हजार कोटींचा महसूल येथील बेव्हरीज उद्योग देतात. येथील उद्योगांना अडचणी आहेत; मात्र त्यांच्यावर मात करीत येथील कंपन्या आपला मार्ग काढत आहेत, असे मुकुंद कुलकर्णी म्हणाले. ‘सकाळ’ कायमच चांगल्या बाबींच्या पाठीशी उभा राहतो. येथील उद्योगांना त्यांची मोठी साथ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

उद्योजकांची मोठी उपस्थिती
राम भोगले, ऋषिकुमार बागला, आशिष गर्दे, मुकुंद कुलकर्णी, जसवंतसिंग राजपूत, संदीप नागोरी, वसंत वाघमारे, सुनील किर्दक, राजेश मानदुने, विनोद गांधी, सदानंद गोडसे, महेश सबनीस, निखिल भालेराव, प्रफुल्ल मालानी, रोहन आचलिया, विष्णू जाधव, दिलीप गौर, अनुराग कल्याणी, संतोष कुलकर्णी, रवी कुलकर्णी, कृष्णा रिठे, मनीष अग्रवाल, अभिषेक, अनुभव अवस्थी, आकाश गायकवाड, संजय लताड, राहुल मोगले, रमण आजगावकर, सरदार हरिसिंग, भगवान राऊत, डॉ. अभय कुलकर्णी, लक्ष्मीनारायण राठी, चंद्रशेखर जैस्वाल, ज्ञानदेव राजळे, अजय शहा, श्रीपाद कुलकर्णी, विजय जैस्वाल, सुहास वैद्य आदींची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

loading image