भारतीय मुस्लिमांनी "इसिस'ला नाकारले - शहानवाज हुसैन

प्रकाश बनकर
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून प्रचारासाठी श्री. हुसैन राज्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत. बुधवारी ते औरंगाबादेत होते. सूर्योदय अटळ आहे, त्याचप्रमाणे राज्यात युतीचे सरकार बहुमताने येणार हे पक्‍के आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस पक्षाची वाईट परिस्थिती आहे. त्यांचे नेते राहुल गांधी पक्षाला सोडून कंबोडियाला गेले. त्यांना माहिती आहे, की महाराष्ट्र आणि हरियानात कॉंग्रेसला सिंगल डिजिट सीट मिळणार आहे. कॉंग्रेसची ही पहिली अशी निवडणूक आहे, की त्यात त्यांना उमेदवार मिळत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

औरंगाबादः जगभरात अनेक मुस्लिम देशाचे लोक इसिस आणि बगदादीच्या जाळ्यात अडकले आहेत. मात्र, भारताच्या मुस्लिम बांधवांनी इसिसच्या थिअरीला साफ नाकारले; कारण इकडे सगळे एकत्र राहतात. त्यांना कुठलीच अडचण नसल्याचे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्‍ते शहानवाज हुसैन यांनी बुधवारी (ता.नऊ) सांगितले. 

विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून प्रचारासाठी श्री. हुसैन राज्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत. बुधवारी ते औरंगाबादेत होते. सूर्योदय अटळ आहे, त्याचप्रमाणे राज्यात युतीचे सरकार बहुमताने येणार हे पक्‍के आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस पक्षाची वाईट परिस्थिती आहे. त्यांचे नेते राहुल गांधी पक्षाला सोडून कंबोडियाला गेले. त्यांना माहिती आहे, की महाराष्ट्र आणि हरियानात कॉंग्रेसला सिंगल डिजिट सीट मिळणार आहे. कॉंग्रेसची ही पहिली अशी निवडणूक आहे, की त्यात त्यांना उमेदवार मिळत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

विरोधकांकडून राफेलला विरोधच 
राफेल विजयादशमीलाच कसे मिळाले, असे प्रश्‍न कॉंग्रेसचे नेते संदीप दीक्षित, अलका लांबा यांनी उपस्थित केले. कॉंग्रेसच्या नेत्यांना हे माहिती पाहिजे की हा सुयोग आहे. विजयादशमीच्या दिवशीच वायुसेना दिवस आहे, त्याचबरोबर विजयादशमीच्या दिवशी शस्त्राची पूजा केली जाते. देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी राफेल हे देशाचे शस्त्र म्हणून त्याची पूजा केली. यात कॉंग्रेसला काय आक्षेप आहे? कॉंग्रेसच्या काळात असे नारळ फोडून पूजा झाली नाही का? असा प्रश्‍नही हुसैन यांनी उपस्थित केला. 

एमआयएम कॉंग्रेसची बी टीम 
मागच्या वेळी काही मतांचे विभाजन झाले, अन्यथा इथे एमआयएम निवडून आले नसते. एमआयएम ही भाजपची नव्हे तर कॉंग्रेसची बी टीम म्हणून काम करीत आहे. या निवडणुकीत मराठवाड्यात भाजप-शिवसेना युती सर्वंच जागा जिंकेल, असा दावाही त्यांनी केला. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Muslims reject Isis - Shahnawaz Hussain