
अनंत वैद्य
बीड : विठ्ठलभक्तीची ओढ असलेले वारकरी राज्याच्या सीमा ओलांडून गेल्या २६ वर्षांपासून इंदूरहून (मध्यप्रदेश) पंढरीची वारी करतात. तीनशेंहून अधिक वारकऱ्यांचा सहभाग असलेली ही दिंडी वाहनातून राजमाता अहिल्यादेवींच्या जन्मस्थानी चोंडीपर्यंत येते. तिथून पुढे पायी मजल-दरमजल करत भाविक पंढरीला मार्गस्थ होतात. पांडुरंगाचे दर्शन आम्हाला जगण्याची उर्मी देते, अशी भावना या यात्रेत सहभागी वारकरी व्यक्त करतात.