esakal | उद्योगमंत्र्यांकडून आदित्य ठाकरेंना घरचा आहेर..
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

डोंबिवलीकरांना नवीन नाहीत. पण यासर्वांसाठी पर्यावरण विभाग जबाबदार आहे असे म्हणत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना घरचा आहेर दिला आहे. ते नांदेड दौऱ्यावर बुधवारी (ता. पाच) आले असता विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. 

उद्योगमंत्र्यांकडून आदित्य ठाकरेंना घरचा आहेर..

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : मुंबईतील डोंबिवली औद्योगीक विकास महामंडळातील विविध रासायनीक कंपन्यामुळे डोंबिवलीकर त्रस्त झाले आहेत. त्यांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे. कारखान्यातील निघणारे सांडपाणी, वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना तेथील नागरिकांना करावा लागत आहे. डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला होता. तर मागच्याच वर्षी एमआयडीसीच्या दावडी गावात गणेशमूर्ती काळवंडल्याचा प्रकार घडला होता. नाल्यात हिरवं, लाल रंगाचं पाणी येणं, घरातल्या भांड्यांवर काळ्या पावडरचा थर जमणं हे प्रकारही डोंबिवलीकरांना नवीन नाहीत. पण यासर्वांसाठी पर्यावरण विभाग जबाबदार आहे असे म्हणत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना घरचा आहेर दिला आहे. ते नांदेड दौऱ्यावर बुधवारी (ता. पाच) आले असता विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. 

कारखान्यातून होणारे जल वायू प्रदूषणावर कारवाई करण्याचे अधिकार हे पर्यावरण विभागाला आहेत. मी स्वतः अनेकदा कारवाईची मागणी केली आहे. परंत या बाबत पर्यावरण विभाग हतबल असल्याचे दिसून येते. डोंबिवली एमआयडीसीमधील प्रोबेस कंपनीत मागच्या वर्षी ता. २६ मे रोजी भीषण स्फोट झाला होता. स्फोट इतका भीषण होता, की कंपनीचे मालक असलेल्या श्री. वाकटकर यांची दोन्ही मुलं, सून यांच्यासह एकूण १२ जणांचा मृत्यू झाला होता, तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. प्रोबेसचा स्फोट यामुळं डोंबिवलीच्या मानवी वस्तीत असलेल्या या कंपन्या इथून हलवाव्यात, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी या कंपन्या स्थलांतरित करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण अजूनही   या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. कारखानदारांच्या संघटनांशी आम्ही बोललो पण त्यांनी स्थलांतरणास नकार दिला. त्यामुळे आता शासन एकतर्फी निर्णय घेण्याचा विचार करत आहे. पर्यायी जागाही शासनाने शोधली असल्याची माहिती उदयॊग्यमंत्री देसाई यांनी दिली.
 

हेही वाचा -  नांदेडातील २९ जणांचे दोन स्टारचे स्वप्न पूर्ण


विश्रामगृहात अधिकाऱ्यांसोबत बैठक

राज्याचे उद्योगमंत्री यांनी शासकिय विश्रामगृहात येथील औद्योगीक विकास महामंडळाच्या अधिकारीव कारखानदारांची बैठक घेतली. कृष्णूर औद्योगीक विकास महामंडळात सध्या किती कारखाने सुरू आहेत व किती बंद आहेत याची सविस्तर माहिती घेतली. कारखानदारांना चांगल्या स्थितीत आणण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद बोंढारकर, प्रकाश मारावार, डॉ. मनोज भंडारी, उमेश मुंडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. 

loading image
go to top