नांदेडातील २९ जणांचे दोन स्टारचे स्वप्न पूर्ण

file photo
file photo

नांदेड : मागील सात वर्षापासून फौजदार पदाचे स्वप्न पाहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर अखेर दोन स्टार लागणार आहेत. राज्यातील दीड हजार पोलिस आता पोलिस उपनिरीक्षक होणार असून त्यातील नांदेड जिल्ह्यातील २९ जणांचा समावेश आहे. 

राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी सन २०१९ च्या सप्टेंबर महिण्यात राज्यभरातील पोलिस कर्मचारी जेष्ठता यादी मागवली होती. त्यानुसार आलेल्या यादीतील दीड हजार पोलिसांची निवड पोलिस उपनिरीक्षकपदी झाली आहे. आस्थापना विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी आपल्या स्वाक्षरीचे ता. तीन फेब्रुवारी रोजी आदेश जारी केले.


वेगवेगळ्या न्यायाधीकरणात होता वाद

राज्यभरातील पोलिस दलामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नियुक्तीचे अनेक वाद असून ते वेगवेगळ्या न्यायाधिकरणाकडे सुरू आहेत. या कर्मचाराऱ्यांची निवड ५० टक्के लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परिक्षेच्या माध्यमातून, २५ टक्के निवड ही खात्यांतर्गत स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून आणि २५ टक्के ही निवड सेवा जेष्ठतेच्या आधारे पदोन्नतीनुसार केल्या जाते. सन २०१३ मध्ये खातेनिहाय परिक्षा घेऊन काही पोलिस कर्मचारी फौजदार पदाच्या परिक्षेत उतिर्ण झाले होते. परंत सध्या त्या कर्मचाऱ्यांना आहे त्याच पदावर मागील सात वर्षापासून पोलिस खात्यात सेवा करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली होती. यापैकी काही पोलिस कर्मचारी यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. 

न्याय मिळाल्याने आनंद

पोलिस विभागात काम करताना आपल्या केलेल्या कामाची पावती म्हणून खात्यांतर्गत न्याय मिळावा अशी प्रत्येक कर्मचाऱ्याची भावना असते. मात्र याच खात्यात तोंड दाबून बुक्याचा मार कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. परंतु देशसेवेसाठी आपले काही समाजाला देणे लागते म्हणून हे कर्मचारी आपल्या वरिष्ठांच्या त्रास सहन करत आपली बिनबोभाटपणे सेवा करतात. आता मात्र या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर लवकरच दोन स्टार दिसणार आहेत. येणाऱ्यांसधीमुळे पोलिस खात्यात नव्या उमेदीने व उर्जेने काम करणार असल्याच्या भावना फौजदार होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बोलुन दाखविल्या. 

नांदेड पोलिस दलातील हे आहेत कर्मचारी

एकनाथ देवके, मरलीधर राठोड, अनिल पांडे, घनश्‍याम वडजे, सुरजीतसिंग माळी, सिद्धार्थ गोणारकर, जसवंतसिंग शाहू, बळीराम राठोड, अब्दुल रब शेख, भगवान सावंत, मारोती सोनकांबळे, किशन राठोड, सय्यद अहेमद, जयसिंग राठोड, अंकुश तिडके, कल्याण मुगळकर, महेमुद जलाल, रमेश खाडे, मोहन राठोड, जुम्माखान पठाण, यादव जांभळीकर, नागनाथ सुर्यतळ, किशोर पवनकर, देवराव केदार, विश्‍वनाथ केंद्रे, ताहेरअली जबार पठाण, मुनीरोद्दीन सय्यद, कृष्णा गुंजकर, एच. एम. पठाण, लहु घुगे, जमील मिर्झा, विठ्ठल बावणे, नागनाथ इप्पलवाल आणि जिलाउलहक्क शेख यांचा समावेश आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com