chandrashekhar bawankule
sakal
फुलंब्री - काँग्रेस पक्षामध्ये सध्या प्रचंड अंतर्गत विसंवाद सुरू असून नेते एकमेकांवर नाराज आहेत. विजय वडट्टीवार, नाना पटोले आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यात समन्वयाचा पूर्णपणे अभाव असून याचा थेट परिणाम पक्षाच्या कार्यपद्धतीवर होत आहे, अशी तीव्र टीका राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. फुलंब्री नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.