esakal | नियोजन समितीच्या निवडीत परभणी पालकमंत्री नवाब मलिक यांचा दुजाभाव; शेकापचे अनाहूत पत्र

बोलून बातमी शोधा

किर्तीकुमार
नियोजन समितीच्या निवडीत परभणी पालकमंत्री नवाब मलिक यांचा दुजाभाव; शेकापचे अनाहूत पत्र
sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : जिल्ह्यात वेग वेगळ्या समित्या निवड करताना पाळकमंत्री नवाब मलिक यांनी दुजाभाव केल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष किर्तीकुमार बुरांडे यांनी शुक्रवारी (ता. ३०) पालकमंत्री नवाब मलिक यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

राज्यात धर्मांध शक्तींना सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकारातून महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. त्याला आमच्या शेतकरी कामगार पक्षा सह इतर पक्षांनी देखील प्रतिसाद दिला. सर्व घटक पक्ष मिळून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलो. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत लहान असो अथवा मोठा असो सर्व घटक पक्षांना आपण न विसरता सोबत घेतले. आमच्यासह सगळ्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर प्रमाणिकपणे काम करुन आघाडी धर्म पाळला. परिणामी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पुढाकारातून शिवसेनेला सोबत घेत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. असे मत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष किर्तीकुमार बूरांडे यांनी पालकमंत्री नबाब मलिक यांना पाठवलेल्या पत्राव्दारे व्यक्त केले.

हेही वाचा - सरकार पुन्हा कारखानदारांच्या बाजूने उभे राहिल्याचे दुर्देवी चित्र पाहयला मिळत आहे

किर्तीकुमार यांच्या पत्रात काय आहे....?

किर्तीकुमार बुरांडे यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की, आपल्या आदेशान्वये परभणी जिल्ह्यात वेगवेगळ्या अशासकीय समित्यांवर धडाधड नियुक्त्या झाल्याचे वृत्तपत्रातून आम्हाला वाचायला मिळाले. त्यात राष्ट्रवादी शिवसेना आणि कॉंग्रेस या प्रमुख तीन पक्षाच्या कार्यकर्त्या मधेच सर्व समित्या वाटुन घेतल्याचे चित्र समोर आले आहे. आसेही स्पष्ट करीत किर्तीकुमार बुरांडे यांनी या निवडी करताना महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांचा आपल्याला पूर्णपणे विसर पडल्याचे दिसत आहे.अशी खंत व्यक्त केली. वास्तविक पाहता आमचा पक्ष किंवा आमचे कार्यकर्ते कोणत्या पदाच्या अपेक्षेने महाविकास आघाडीत सहभागी झाले नसून फक्त धर्मनिरपेक्ष पक्षांची एकजूट हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही‌ आपल्या सोबत आहोत यात दुमत नाही पण निवडणूक झाल्यावर ईतर घटक पक्षांना त्यांची ताकत कमी समजुन त्यांना दुर्लक्षीत करणे ही बाब राज्यातील पुढील राजकीय वाटचालीच्या द्रष्टीने पुरक ठरणारी नाही. राष्ट्रवादी हा मोठा पक्ष‌ असल्याने सर्व घटक पक्षांना न्याय देणे व त्यांची एकजुट टिकवुन ठेवणे ही पालकमंत्री या नात्याने तुमची जबाबदारी आहे.असे जिल्हाध्यक्ष भाई श्री.बुरांडे यांनी म्हटले.

संपादन- प्रल्हाद कांबळे