
अंबड : जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील मार्डी येथील प्रयोगशील शेतकरी संतोष राहटगावकर व त्यांची पत्नी प्रिया राहटगावकर यांनी मार्डी शेतशिवारात एक एकर जमिनीमध्ये एक एप्रिल 2025 मध्ये पिवळा, लाल झेंडू, पिवळा,लाल गलांडा, गुलाब या फुलांची एका एकर मध्ये जवळपास पाच हजार रोपांची लागवड केली. लागवड करताना चार बाय दीड चे अंतर ठेवण्यात आले. फुलांना पाण्याची मात्रा देण्यासाठी ठिंबकसिंचन करण्यात आले आहे.