esakal | Video : महिलांसाठी ‘शुभंकरोती’चा अभिनव उपक्रम, कोणता? ते वाचाच 

बोलून बातमी शोधा

Nanded News

ग्रामीण व शहरी गातील पायाभूत सुविधांवर काम करताना पायाभूत सुविधांसह जीवनाशी निगडित इतर सामाजिक घटकांवर, त्यांच्या विविध प्रश्‍नांवर कार्य करण्यासाठी शुभंकरोती फाउंडेशन ही सामाजिक संस्था काम करत आहे.

Video : महिलांसाठी ‘शुभंकरोती’चा अभिनव उपक्रम, कोणता? ते वाचाच 
sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. या काळात आर्थिक समस्या, वैश्‍विक समस्येवर मात करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. सद्यस्थितीत रोजगार बुडाल्याने हातावर पोट असलेल्या कुटुंबाचे हाल होत आहेत. विशेषतः महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी नांदेडसह परभणी व हिंगोली जिल्‍यातील १० हजार गरजू महिलांना मोफत सॅनिटरी नॅपिकनचे वाटप जूनपर्यंत करण्यात येणार आहे. 

शुभंकरोती फाउंडेशन ही महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील संस्था. मराठवाडा, विदर्भातील सामाजिक व आर्थिक मागास परिसरातील महिला व मुलींना समान हक्क, शिक्षण, आरोग्य, प्राबल्य मिळावे, या भागांमध्ये कल्याणकारी उपक्रम राबवून लोकहितार्थ काम करत आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून थेट फिल्डवर काम करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी वैचारिकदृष्ट्या परिपक्व असलेले ३० ते ४० वयोगटातील युवक-युवती पारंपरिक समाजकार्याला छेद देऊन व्यक्तीच्या जीवनात थेट बदल घडविण्यासाठी, तसेच समाजपरिवर्तनासाठी प्रयत्न करत आहेत. 

हेही वाचाच - नांदेडची अभिनव चित्रशाळा आहे लय भारी, कशी? ते वाचाच

‘स्वच्छतेतून स्वयंरोजगाराकडे’ 
मासिक पाळी हा जरी नैसर्गिक संक्रमणाचा काळ असला तरी त्या काळातील स्वच्छता, पोषक आहार आणि आरोग्यविषयी घ्यावयाच्या काळजीचा अभाव आजही समाजात आहे. शालेय शिक्षण पद्धतीत अंतर्भूत नसलेल्या आणि लज्जेची बाब समजून उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या या आरोग्यविषयक बाबीला उघडपणे बोलणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने महिला व मुलींचे आरोग्य या विषयावर सातत्त्याने मराठवाड्यात काम करत असलेल्या शुभंकरोती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून ‘स्वच्छतेतून स्वयंरोजगाराकडे’ या महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. 

१० हजार महिलांना करणार वाटप
महिला व मुलींच्या आरोग्यासाठी पूरक अशा उच्च दर्जाच्या सॅनिटरी पॅडचा निर्मिती प्रकल्प शुभंकरोती फाऊंडेशनतर्फे उभारला आहे. महिलांसाठी महिलांनी तयार केलेला सॅनिटरी नॅपकीनचा हा उद्योग ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर सुरु आहे.  या प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना मासिक पाळीतील स्वच्छता, पोषक आहार, आरोग्याविषयी घावयाच्या काळजी आणि ग्रामीण भागात आज उपलब्ध नसलेल्या उच्च दर्जाच्या सॅनिटरी पॅडचा महिला स्वयंरोजगारांमार्फत पुरवठा ‘स्वच्छतेतून स्वयंरोजगाराकडे’ या उपक्रमांतर्गत नांदेडसह परभणी व हिंगोली जिल्ह्यातील जी गावे १०० किलोमिटरच्या आत आहे, तेथे केला जाणार आहे. 

‘सॅनिटरी पॅड’ निर्मिती प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • यूव्ही स्टरलाईझ पॅडमुळे आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम नाही
  • आरोग्यासाठी अपायकारक केमिकल, कलर व पदार्थ यांचा समावेश नाही
  • सर्वप्रकारच्या इन्फेक्शनपासून सुरक्षित
  • सॅनिटरी पॅडमध्ये एक्स्ट्रा अॅबसाॅर्पशनची क्षमता
  • इको फ्रेंडली सॅनिटरी पॅड
  • मल्टी नॅशनल ब्रॅंड कंपनीच्या पॅडच्या तुलनेचे सॅनिटरी पॅड

येथे क्लिक करा - coronavirus - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

संस्थेचा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘सॅनिटरी पॅड निर्मिती प्रकल्प’. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने आर्थिक समस्या उद्‍भवू लागली आहे. या कालवधीत विशेष करून महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी १० हजार महिलांना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात येत आहे.  
- किरण चौधरी (अध्यक्ष, शुभंकरोती फाउंडेशन)