coronavirus - बीड जिल्ह्यात ३१ नमुन्यांची तपासणी; सातचा अहवाल बाकी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 April 2020

कोरोना विषाणूवरील उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अशा दोन ठिकाणी विलगीकरण कक्षांची उभारणी पूर्ण झाली आहे.

बीड - जिल्ह्यात बुधवारपर्यंत (ता. एक) एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात ३१ जणांच्या स्वॅबची तपासणी केली असून, यातील २४ नमुने निगेटिव्ह आढळले आहेत. बुधवारी नऊ नमुन्यांचा अहवालही निगेटिव्ह आला असून सात नमुन्यांचा अहवाल बाकी आहे. 

कोरोना विषाणूवरील उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अशा दोन ठिकाणी विलगीकरण कक्षांची उभारणी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करून घेतलेल्या २० जणांच्या तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलेल्या ११ पैकी चार नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, तेही निगेटिव्ह आहेत. येथील सात नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. 

हेही वाचा - coronavirus- कोरोनाशी लढ्याचा बीड पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक

परदेशांतून आलेल्यांमुळे वाढली संख्या 
दरम्यान, सोमवारी उशिरापर्यंत जिल्ह्यात १६ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात येऊन सर्वांचेच नमुने निगेटिव्ह आले; परंतु आता परदेशातून आलेल्यांमुळे तपासणीचा आकडा ३१ पर्यंत वाढला आहे. यात आष्टीच्या नऊ जणांचा समावेश आहे. मंगळवार-बुधवारी दाखल करून घेऊन तपासणीसाठी स्वॅब पाठविलेल्यांचा आकडा १५ होता. यापैकी नऊ जणांचा तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आढळला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspection of 6 specimens in Beed district; Report of seven left

Tags
टॉपिकस
Topic Tags: