बीड : जिल्ह्यातील जवळपास दहा हजार पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची जैविक व रासायनिक दृष्ट्या गावातच तपासणी करून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन करण्यासाठी पाच कुशल महिलांची निवड करण्यात आलेली आहे..Raids on slaughterhouse : कत्तलखान्यावर छापे; १२ आरोपी जेरबंद, २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या मदतीने सर्व जलस्त्रोतांची तपासणी होणार आहे. या सर्व उपक्रमाचे सह नियंत्रण गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी दिली..जिल्ह्यातील जवळपास दहा हजार पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत असून आरोग्य विभाग ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व पंचायत विभाग यांच्या समन्वयाने रासायनिक व जैविक तपासणी करून ही नोंद केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अद्ययावत केली जाणार आहे. पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत पाणी नमुने जलसुरक्षकांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात पोचविण्यासाठी प्रत्येक तालुक्याचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला असून त्यांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पाणी नमुने प्रयोगशाळेत जात आहे. .जिल्ह्यात पाणी तपासणीसाठी आष्टी, बीड, गेवराई, माजलगाव, परळी तालुक्यात पाच उपविभागीय प्रयोगशाळा आहे. या सर्व प्रयोगशाळा भूजल सर्वेक्षण यंत्रणा कार्यालयामार्फत सनियंत्रित केले जातात. प्रत्येक प्रयोगशाळेमध्ये रसायनी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे दोन कर्मचारी उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील सर्व विस्ताराधिकारी आरोग्य तसेच पंचायत आरोग्य कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी व जलसुरक्षकांना पंचायत समितीस्तरावर प्रशिक्षण दिले असून या प्रशिक्षणात जलस्त्रोत पिण्याचे पाणी नमुने ऑनलाईन करण्यासाठीची पद्धत समजावून सांगण्यात आलेली आहे. प्रशिक्षण घेण्यासाठी जिल्हा साथ रोग वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.के. पिंगळे, संजय मिसाळ, अमोल कुलकर्णी, साजिद शेख, संदीपान मांडवे, भारत नागरगोजे परिश्रम घेतले आहे..Crackdown Garbage Burning : कचरा उचलण्यापेक्षा पेटविण्यावर पालिकेचा जोर, धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात .पाच कुशल जलरक्षकांची नियुक्तीया विशेष उपक्रमात जलजीवन मिशन अंतर्गत नव्याने निर्माण झालेले स्त्रोत यांचे देखील जिओ टॅग करण्याची मोहीम ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने हाती घेतली आहे. प्रत्येक गावात अंगणवाडी ताई, आशा कर्मचारी व बचतगटांच्या सदस्य अशा पाच कुशल महिला व जल सुरक्षकांनी पिण्याचे पाणी नमुने ग्रामपंचायतस्तरावर तपासणी करावी. याकरिता पाठपुरावा सुरू असल्याची माहिती विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र मोराळे यांनी दिली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.