esakal | आमदार बालाजी कल्याणकर यांच्याकडून ग्रामीण व शहरी रुग्णालयांची पहाणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

निळा, लिंबगाव, रहाटी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी भेटी दिल्या. दरम्यान निळा येथे गटविकास अधिकारी श्री. तोटावाड, डॉ. बालाजी मिरकुटे यांची उपस्थिती होती

आमदार बालाजी कल्याणकर यांच्याकडून ग्रामीण व शहरी रुग्णालयांची पहाणी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी ग्रामीण भागातील रुग्णालयाची पाहणी केली त्यात निळा, लिंबगाव, रहाटी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी भेटी दिल्या. दरम्यान निळा येथे गटविकास अधिकारी श्री. तोटावाड, डॉ. बालाजी मिरकुटे यांची उपस्थिती होती तसेच लिंबगावमध्ये डॉ. देशमुख, रहाटी येथे डॉ. चव्हाण यनीही त्यांना माहिती दिली. 

शहरामध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांनी जंगमवाडी आरोग्य केंद्राला भेट देवून पाहणी केली असता वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बद्दोदिन आदिंनी माहिती दिली. अधिकारी व आमदार बालाजी कल्याणकर यांनी विनायकनगर हॉस्पीटल व नाना- नानी पार्क येथील नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड कै. सुधाकरराव डोईफोडे स्मृती जेष्ठ नागरिक भवन येथे उभारण्यात आलेल्या केंद्रास भेट देवून पाहणी केली. शहरातील गुरुगोविंदसिंघजी हॉस्पीटलला भेट दिली. तेथील कोरोना संशयित रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या केंद्राची पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांची उपस्थिती होती.

हेही वाचा ग्रामीण भागातील हार्वेस्टरचीही चाके थांबली

अत्यावश्यक सेवा पुरविणा-या सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन 

दरम्यान मुंबई -पुणे येथून येणा-या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या व्यक्तींची तपासणी झाल्यानंतर नांदेड शहरात व ग्रामीण भागात प्रवेश देण्याच्या सूचना आ. बालाजी कल्याणकर यांनी दिल्या आहेत. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी स्वतः चा जिव धोक्यात घालून रुग्णांची सुश्रृशा करणारे डॉक्टर, नर्स, कॅम्पाडर, औषध विक्रेते, वाहन चालक, पोलीस प्रशासनातील सर्व कर्मचारी, महसूल यंत्रणा, स्वच्छता करणारे सर्व कर्मचारी, दुध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, अत्यावश्यक सेवा पुरविणा-या सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन आमदार कल्याणकर यांनी केले आहे.