Success Story: शेतकरी पुत्राची एकाचवेळी दोन पदांसाठी झाली निवड
Farmer Son Success: लातूर जिल्ह्यातील शेतकरी मुलगा नीलेश सेलुकर याने एकाच वेळी मुंबई पोलिस दलातील दोन पदांवर यश मिळवले. कमी संसाधनांत, ट्रॅक्टर चालवत अभ्यास करत मिळवलेले हे यश परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
किल्लारी : औसा तालुक्यातील शिवपूर (गाडवेवाडी) येथील शेतकरी कुटुंबातील नीलेश किशोर सेलुकर या युवकाने एकाच वेळी दोन पदांवर यश मिळविले असून, त्याचे कौतूक होत आहे.