अर्धापूर - घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतांना, पित्याच्या छत्राची छाय नसतांना, सर्व संकटांवर मात करून अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे..यात नांदला येथील दुर्गा ज्ञानेश्वर क्षिरसागर व मालेगाव येथील नियती इंगोले यांचा समावेश आहे. त्या पुण्यजागर शैक्षणिक प्रकल्पातील विद्यार्थीनी असुन, पुण्यातील भोई प्रतिष्ठाने त्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. त्यांचे शिक्षण पुणे परिसरातील विर येथील अस्तित्व गुरुकुलमध्ये सुरू आहे. या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे..पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी पुण्यजागर शैक्षणिक प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी दहा शेतकरी कुटुंब दत्तक घेण्यात आली आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून आठ विद्यार्थी अस्तित्व गुरुकुलमध्ये शिक्षण घेत आहेत..यंदाच्या दहावीच्या परीक्षेत दुर्गा ज्ञानेश्वर क्षिरसागर ८६:४० टक्के, तर नियती प्रभाकर इंगोले ७७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी घोषित झालेल्या बारावीच्या परिक्षेत नामदेव इंगोले हा विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे.या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असुन चांगले शिक्षण घेऊन आपले चांगले भवितव्य घडविण्यासाठी त्या पुण्यात शिक्षण घेत आहेत. त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, हेमंत गोसावी, सेवा निवृत्त शिक्षक अधिकारी अनिल गुंजाळ, पल्लवी वाघ, गितांजली देगावकर, आर्चिता मडके आदी पुढाकार घेत आहेत..या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पुण्यजागर प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख, विश्वांभर पवार, बाळु पाटीलधुमाळ, गुणवंत विरकर, नागोराव भांगे, निळकंठ मदने, दत्त टोकलवाड, डॉ. वैभव पुरंदरे सुधाकर टाक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..मला आपीएस व्हायचे आहे - दुर्गा क्षिरसागरमाझ्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली आहे. आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची व शेती नाममात्र आहे. आई मजुरी करते. मी पुण्यजागर शैक्षणिक प्रकल्पाच्या माध्यमातून पुण्यात शिक्षण घेत असुन, मला आपीएस व्हायचे आहे. अशा भावना दुर्गा क्षिरसागरने व्यक्त केल्या आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.