Beed Crime: परळी तालुक्यात परप्रांतीय तरुणीवर काम देण्याचा आमिष दाखवून; सामूहिक अत्याचार
Beed News: परप्रांतीय तरुणीवर काम देण्याच्या आमिषाने तृतीयपंथीयासह चार जणांनी सामूहिक अत्याचार केले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतून पीडितेची सुटका केली आहे.
बीड : काम देण्याचे आमिष दाखवून एका तृतीयपंथीयाने परप्रांतीय २० वर्षीय तरुणीला आपल्या साथीदारांच्या हवाली केले. त्यानंतर तिघांनी अत्याचार केल्याची घटना परळी तालुक्यातील अस्वलआंबा शिवारात घडली.